

मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तथा राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते यांनी राज्य पोलीस महासंचालकाचा शनिवारी दुपारी पदभार स्वीकारला. यावेळी वरिष्ठ अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत केले.
दोन वर्षांपूर्वी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक म्हणून देण्यात आलेल्या मुदतवाढीची दोन वर्षे ३ जानेवारीला शनिवारी संपली. त्यांच्या जागेवर एनआयएप्रमुख सदानंद दाते यांची लोकसेवा आयोगाच्या समितीच्या शिफारशीनुसार पोलीस महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेचे ( एनआयए) प्रमुख म्हणून सदानंद दाते केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी शनिवारीच कुलाबा येथील पोलीस महासंचालक कार्यालयात पोलीस महासंचालकाचा स्वीकारला. यावेळी वरिष्ठ पोलीस पदभार अधिकारी यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मात्र ते प्रसारमाध्यमांशी बोलले नाहीत. ते यावर्षी डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार असले तरी त्यांना २ वर्षांचा कालावधी मिळण्याची शक्यता आहे.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सदानंद दाते यांनी चांगली भूमिका निभावली. तेव्हा ते मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांनी कामा रुग्णालयात आतंकवाद्यांशी शौयनि संघर्ष केला. त्यात ते जखमी झाले होते. या पराक्रमाबद्दल दाते यांना राष्ट्रपर्तीचे शौर्यपदक मिळाले.