मुंबईत कोटीचा फ्लॅट, ऑडी कार बाळगणारा गुजरातचा श्रीमंत चोर!

लाखाची चोरी करताना पकडल्यावर समोर आली आलिशान जीवनशैली
Thief arrested by Gujarat Police
चोराला गुजरात पोलिसांनी वापीमध्ये बेड्या ठोकल्या.Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईत तब्बल एक कोटी रुपये किमतीचा फ्लॅट, स्वत:ची ऑडी कार, सतत विमानाने प्रवास, मोठमोठ्या हॉटेलांत मुक्काम करणारा एखादा व्यक्ती चोर असू शकेल, यावर सहसा कुणी विश्वास ठेवणार नाही; पण हे वास्तवात घडले असून, अशा या श्रीमंत चोराला नुकतेच गुजरात पोलिसांनी वापीमध्ये बेड्या ठोकल्या आहेत.

Thief arrested by Gujarat Police
Nashik Crime News|शेअर मार्केटचे आमीष देत ३.५९ कोटींचा गंडा

रोहित कनुभाई सोलंकी असे या चोराचे नाव आहे. विविध राज्यांतील चोरी आणि दरोड्यांच्या घटनांचा तपास करताना तो गुजरातच्या वलसाड पोलिसांच्या तावडीत सापडला. गेल्या महिन्यात वापी येथे एक लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. नंतर चौकशीत त्याने या चोरीसह एकूण 19 दरोडे घातल्याची कबुली देतानाच आपली आलिशान जीवनशैलीही कथन केली. त्याचे राहणीमान ऐकून पोलिसांनीही बोटे तोंडात घातली.

Thief arrested by Gujarat Police
Crime News | पनवेलच्या तरुणीने जीवन संपविले, नाशिकच्या प्रियकराला अटक

डान्स बार, नाईट क्लब पार्ट्या; 19 दरोडे

रोहितने एका मुस्लिम युवतीशी लग्न केले होते. त्यासाठी रोहितने आपले नाव बदलून अरहान ठेवले होते. एवढेच नाही, तर तो मुंबईतील डान्स बार आणि नाईट क्लबमध्ये पार्ट्यांचाही आनंद लुटायचा. त्याला ड्रग्जचेही व्यसन असून, यासाठी तो महिन्याला तब्बल 1.50 लाख रुपये उधळायचा. रोहितने विविध राज्यांत मिळून एकूण 19 दरोडे घातले. यात वलसाडमधील तीन, सुरतेत एक, पोरबंदर एक, सेलवाल एक, तेलंगणा दोन, आंध्र प्रदेश दोन, मध्य प्रदेश दोन आणि महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे.

Thief arrested by Gujarat Police
Jalgaon Crime | रेल्वे अधिकाऱ्याच्या फोटोचा गैरवापर; व्हाट्सअपला बनवले बनावट खाते

विमानाने जात रेकी

रोहितने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो मुंब्रा परिसरात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भव्य फ्लॅटमध्ये राहत होता. त्याच्याकडे स्वत:ची महागडी ऑडी कारही आहे. चोरी करण्याआधी रोहित विमानाने विविध राज्यांत जायचा. तेथे मोठ्या शहरांत जाऊन कॅबने प्रवास करायचा. आलिशान हॉटेलांत त्याचा मुक्काम असायचा. चोरीची योजना आखण्याआधी शहरातील विविध सोसायट्यांची रेकी करायचा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news