Jalgaon Crime | रेल्वे अधिकाऱ्याच्या फोटोचा गैरवापर; व्हाट्सअपला बनवले बनावट खाते

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalgaon Crime
रेल्वे अधिकाऱ्याच्या फोटोचा गैरवापर; व्हाट्सअपला बनवले बनावट खातेfile photo

जळगाव : भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इती पांडे यांच्या फोटोचा गैरवापर करून व्हाट्सअप वर खाते उघडून त्यावर डीपी ठेवला व रेल्वे अधिकारी असल्याचे भासवीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी 4 जुलैला त्या अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ मंडळ विभागाच्या डीआरएम इती पांडेय यांचा फोटोचा वापर करून एका अज्ञात मोबाईल धारकाने व्हाट्सअप वर खाते उघडले. त्या खात्यावर डीआरएम इती पांडेय यांचा फोटो लावून रेल्वेचा अधिकारी असल्याचे दाखविले. हा प्रकार गुरूवार ४ जूलै रोजी समोर आला. भुसावळ रेल्वे सुरक्षा बल विभागाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांनी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी ४ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बनावट व्हॉटसॲप खाते तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news