

मुंबई ः राज्य परीक्षा परीषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील राखीव ठेवलेल्या 2 हजार 207 उमेदवारांचा निकाल वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली आहे.
राज्य परीक्षा परीषदेमार्फत राज्यभरात आयोजित केलेल्या या परीक्षेला 2 लाख 28 हजार 808 पैकी 2 लाख 11 हजार 308 उमेदवार प्रवीष्ट झाले होते. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे संबंधित व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत उमेदवारांनी सादर करणे अनिवार्य होते. त्यासाठी मुदतवाढ देऊनही गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र या कार्यालयास सादर केले नाही, अशा 2 हजार 207 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. मात्र त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने या उमेदवारांचा निकाल रद्द करण्यात आला आहे.
कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही
उमेदवारांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ुुु.ाीलशर्ीिपश.ळप या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तथापि या बाबतीत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सद्य:स्थितीत केला जाणार नसल्याचे परीक्षा परीषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.