मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा ठराव मंजूर

राज्य सरकारला 'नाना शंकरशेट' यांच्या नावाच्या प्रस्तावाचा मात्र विसर
Resolution approved for renaming of eight railway stations in Mumbai
राज्य सरकारने मंगळवारी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील एकूण आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा ठराव विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.Railway File Photo

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील एकूण आठ रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा ठराव विधान परिषदेत मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आला. राज्य सरकारने मंगळवारी विधान परिषदेत मध्य रेल्वेवरील दोन, पश्चिम रेल्वेचे दोन आणि हार्बर मार्गावरील चार रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मांडला. हा प्रस्ताव सोमवारी कामकाज पत्रिकेत दाखवण्यात आला होता. मात्र, पावसामुळे सभागृहाचे कामकाज दुपारनंतर तहकूब केल्यामुळे मंगळवारी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम १०६ अन्वये ठराव मंजुरीसाठी मांडला.

Resolution approved for renaming of eight railway stations in Mumbai
कोकणात १५ जुलैपर्यंत राहणार अतिवृष्टीचा जोर

या प्रस्तावानुसार -

  • मध्य रेल्वे मार्गावरील करीरोड स्थानकाचे 'लालबाग रेल्वे स्थानक', सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाचे 'डोंगरी रेल्वे स्थानक' पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाईन्स

  • रेल्वे स्थानकाचे 'मुंबादेवी रेल्वे स्थानक'

  • चनीं रोड स्थानकाचे 'गिरगांव रेल्वे स्थानक'

  • हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीनचे 'काळाचौकी रेल्वे स्थानक',

  • डॉकयार्ड रोडचे 'माझगांव रेल्वे स्थानक'

  • किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे 'तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक

अशी नावे बदलण्यात येतील. ठरावाला मिळालेल्या मंजुरीनुसार त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारला शिफारस केली जाणार आहे.

Resolution approved for renaming of eight railway stations in Mumbai
Stock Market Updates | विक्रमी उच्चांकावर खुले झाल्यानंतर सेन्सेक्स- निफ्टीचा यू-टर्न

'नाना शंकरशेट' यांच्या नावाचा विसर

मुंबईत मुलींची पहिली शाळा सुरू करणारे तसेच मुंबईच्या औद्योगिक आणि सामाजिक पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे, ज्यांच्या पुढाकाराने बोरिबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली ते नामदार जगन्नाथ शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याचा ठराव राज्य सरकारने यापूर्वीच मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. या ठरावाचा पाठपुरावा करण्याचा मात्र सरकारला विसर पडला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news