RERA Homebuyer Rights: घराचा ताबा उशिरा मिळतोय? घर खरेदीदारांसाठी मोठा दिलासा; व्याजासह पैसे परत घेण्याचा अधिकार

वेळेत घराचा ताबा न दिल्यास पैसे व्याजासह परत द्यावे; ‘रेरा’ कलम १८(१) वर उच्च न्यायालयाचा निर्वाळा
Maharera
MahareraPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: 'रेरा' कायद्यातील कलम १८(१) नुसार जर बिल्डर ठरलेल्या वेळेत घराचा ताबा देऊ शकला नसेल तर घर खरेदीदाराला प्रकल्पातून बाहेर पडून आपले पैसे व्याजासह परत मागण्याचा संपूर्ण आणि बिनशर्त अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

नाशिक येथील गृहप्रकल्पात वेळेत ताबा न मिळाल्याने हतबल झालेल्या घर खरेदीदारांनी न्यायालयीन लढा सुरु केला होता. बांधकाम व्यावसायिकाने भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पैसे परत करू, असा बचावाचा युक्तीवाद केला. न्यायालयाने बिल्डरचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला.

Maharera
Formula Milk: फॉर्म्युला दुधाच्या प्रचारावर व उत्पादनांवर आता 'एफडीए'ची करडी नजर; डॉक्टर, रुग्णालये, ई-कॉमर्सला नियम लागू

नाशिकच्‍या ग्राहकाला दिलासा

घर खरेदीदार नितीन शेवाळे आणि शीतल शेवाळे यांनी २०१५ मध्ये नाशिकच्या द्वारका, तपोवन रोड परिसरातील सांकलेचा कन्स्ट्रक्शन्सच्या 'वॉटरवेज' प्रकल्पात फ्लॅट बुक केला होता. करारनाम्यानुसार ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्राहकांनी २२ लाख ५८ हजार १७८ रुपये बिल्डरला दिले होते. बिल्डर वेळेत ताबा देऊ न शकल्याने ग्राहकांनी 'महारेरा'कडे दाद मागितली.

महारेराने ग्राहकांना प्रकल्पातून बाहेर पडण्याची परवानगी दिली, पण बिल्डरची आर्थिक कोंडी होऊ नये म्हणून ओसी मिळाल्यानंतर बिल्डरने व्याजासह पैसे परत करावेत, अशी सूट दिली होती. या सवलतीविरोधात ग्राहकांनी 'रेरा अपीलीय न्यायाधिकरण'कडे दाद मागितली होती. त्यांनी बिल्डरची ही सवलत रद्द करून घर खरेदीदारांचे पैसे तत्काळ देण्याचे आदेश दिले होते.

Maharera
CSMT 75 days block: प्रवाशांनो लक्ष द्या! सीएसएमटी स्थानकावर ७५ दिवसांचा ब्लॉक; दादर, ठाणे येथे थांबणार काही गाड्या

त्या निर्णयाला सांकलेचा कन्स्ट्रक्शन्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी घर खरेदीदारांच्या हक्कांना प्राधान्य देत बिल्डरची याचिका फेटाळून लावली. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण सर्वोच्च बाब असल्याचे न्यायालयाने निर्णय देताना नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news