CSMT 75 days block: प्रवाशांनो लक्ष द्या! सीएसएमटी स्थानकावर ७५ दिवसांचा ब्लॉक; दादर, ठाणे येथे थांबणार काही गाड्या

येत्या १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हा पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.
train
trainfile photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास कामासाठी मध्य रेल्वेकडून फलाट क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर एकूण ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे.

येत्या १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हा पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ वर घेण्यात आलेल्या ब्लॉकची मुद्दतही पुन्हा वाढविण्यात आली आहे.

आरएलडीएकडून फलाट क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर पायाभरणीचे काम आणि इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. काम पूर्ण होईपर्यंत फलाट क्रमांक १४ आणि १५ वरून होणारी रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. त्यानंतर हे फलाट वाहतुकीसाठी आरएलडीएकडून रेल्वेला हस्तांतरित केले जाणार आहेत.

train
MPSC Exam Reform: ‘एमपीएससी’ परीक्षा, निकाल अन् नियुक्तीचे दिवस निश्चित होणार; व्ही. राधा यांची माहिती

एक्सप्रेस गाड्या कुठे थांबतील?

ब्लॉक दरम्यान, सीएसएमटी 'अप' दिशेच्या (११००२) बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेस, (१२८१०) हावडा एक्सप्रेस, (१२११२) अमरावती एक्सप्रेस, (११०२०) भुवनेश्वर - कोणार्क एक्सप्रेस, (२२१२०) मडगांव तेजस एक्सप्रेस (२२१४४) बिदर एक्सप्रेस, ( २२१०८) लातूर एक्सप्रेस गाड्या दादर येथे थांबणार आहेत. शिवाय (१२१३४) मंगळुरू एक्सप्रेस ठाणे येथे थांबविल्या जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news