Malad Protest : मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसांनी अडवले

या प्रकल्पाच्या विरोधात वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
malad news
Malad Protest : मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसांनी अडवलेfile photo
Published on: 
Updated on: 

Police stopped those participating in the march against the Manori desalination project

मालाड : पुढारी वृत्तसेवा मनोरी येथे प्रस्तावित ४०० एमएलडी क्षमतेच्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात मच्छीमार, शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत.

malad news
Nanded Crime News : नांदेडमध्ये ब्राऊन शुगरसह दोघे जेरबंद; गुन्हे शाखेची धडक कारवाई

या प्रकल्पाच्या विरोधात आज सकाळी १० वाजता वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मोर्चात सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी अडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

malad news
Nanded-Hyderabad Route Accident : डॉक्टर अन् आरटीओ अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचले युवकाचे प्राण

मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसांनी गोराईत अडवल्याचा आरोप मोर्चेकरी ग्रामस्थ आणि कोळी बांधवांनी या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो आणि अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

logo
Pudhari News
pudhari.news