Reliance AI Platform: रिलायन्सकडून आता देशी ‘एआय’चा नारा!

घरगुती उपकरणांपासून औद्योगिक वापरासाठीच्या एआय उत्पादनांची घोषणा
Reliance AI Platform
Reliance AI PlatformPudhari
Published on
Updated on

मुंबई: घरगुती उपकरणांपासून आरोग्य, शेती, व्यवसाय, कॉर्पोरेट सेवा अशा विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित उत्पादने आणण्याची घोषणा शुक्रवारी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. भारताचे स्वतःचे एआय व्यासपीठ तयार केले जाणार असून ते देशातील २२ भाषांमध्ये असेल, असे कंपनीने सांगितले .

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स समूहाच्या पुढील पिढीतील व्यवसायाची घोषणा करण्यात आली. रिलायन्स इंडस्ट्रीजने कॉम्प्युटिंग पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट सेवा व ग्राहक केंद्रित ॲप्लिकेशन्स आणण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जगातील सर्वात मोठ्या एआय कॉम्प्युट प्लॅटफॉर्मपैकी एक उभारण्याची घोषणा केला. सोबतच फोन कॉल्स तसेच घराघरांपर्यंत थेट एआय तंत्रज्ञान पोहोचण्याची योजना आखण्यात आली असल्याचे जाहीर केले.

Reliance AI Platform
Uddhav Thackeray | पक्षप्रमुखपद सोडण्यास तयार; उद्धव यांच्या प्रस्तावाने खळबळ

आरोग्यसेवा, शिक्षण आणि शेतीसाठी एआय

रिलायन्सने ग्राहक, व्यवसाय आणि सार्वजनिक सेवांसाठी उपयुक्त अशा एआय आधारित ॲप्लिकेशन्सची मालिकाही सादर केली. या पोर्टफोलिओमध्ये जिओ भारत आयक्यूचा समावेश आहे. हे उत्पादन भारतीयांचा साथीदार ठरेल, असे अंबानींनी सांगितले.

व्यापारी आणि लहान व्यवसायांसाठी जिओ एआय असिस्टंट, आरोग्यसेवेच्या मदतीसाठी जिओहेल्थ आयक्यू, शिक्षणासाठी जिओलर्न आयक्यू आणि शेतकऱ्यांसाठी जिओकृषी आयक्यू तयार करण्यात आले आहे. या सर्व सेवा भारतातील २२ भाषांमध्ये तयार केल्या जात आहेत.

एआय असिस्टंट आता फोन कॉलवर

जिओ नेटवर्कमध्ये एआय एजंट आणण्यात आला आहे. फोन कॉलदरम्यान ‘हे जिओ’ असे म्हणून या असिस्टंटला सक्रिय करता येईल. हा एआय एजंट व्हॉईस कॉलचे लिपीमध्ये रूपांतर करू शकतो. कॉन्फरन्स कॉलमध्ये १० पर्यंत वक्त्यांना ओळखण्याची त्याची क्षमता आहे. संवादाचा सारांश, स्मरणपत्रे आणि कृती घटक (ॲक्शन आयटम्स) तयार करून ते सहभागींसोबत शेअर करू शकतो. याशिवाय कॅब बुक करणे, जेवण मागविणे, रेस्टॉरंटमध्ये टेबल आरक्षित करणे आणि मीटिंगचे वेळापत्रक ठरवणे यांसारखी कामे देखील करू शकतो.

Reliance AI Platform
Eknath Shinde | हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकीच; शिंदे यांचा घणाघात

जामनगरमध्ये उभारणार एआयचा कणा

गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्स इंटेलिजन्स भारताचा एआयचा कणा उभारत आहे. हा प्रकल्प पूर्णपणे रिलायन्सच्या स्वतःच्या सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पातून मिळणाऱ्या स्वच्छ ऊर्जेवर चालणार आहे. रिलायन्सने एआय सज्ज डेटा सेंटर्स उभारण्यासाठी १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news