Sanjay Raut: भाजपचे प्रदेशाध्यक्ष दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांनी डिवचलं

महायुतीच्या सभेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लुंगी परिधान केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautfile photo
Published on
Updated on

Sanjay Raut

मुंबई : महायुतीच्या सभेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी परिधान केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या पेहरावाचा उल्लेख 'रसमलाई इफेक्ट' असा केला आहे.

Sanjay Raut
Fadnavis On Uddhav Thackeray: माझ्या पोरानं हिंदूत्व चालवलं, वडिलांना अभिमान... आई-वडिलांवर घसरणाऱ्यांना फडणवीसांचा 'करारा जवाब'

संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये रवींद्र चव्हाण यांना डिवचताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. "गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी घातली का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे. चव्हाणांना एखादा मोकळा-ढाकळा मराठी लेंगा घालता आला नसता का, असा टोलाही त्यांनी लगावला. चव्हाण यांनी केलेल्या या दाक्षिणात्य पेहरावावरून खासदार राऊत यांनी त्यांना लक्ष केले असून, सोशल मीडियावर ही 'रसमलाई इफेक्ट'ची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

महामुंबई गुजरातला देण्याचा सरकारचा घाट

मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, रायगडची महत्वाची मराठी शहरे गुजरातला देण्याचा घाट या सरकारने घातला असून यासाठी अदानीला एजंट नेमले आहे. असा जोरदार हल्ला उद्धव आणि राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत केला. तुमची मराठी शहरे वाचवा आणि महापालिकेमधून या महायुतीला हद्दपार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ठाणे गडकरी रंगायतनच्या समोर ठाकरे बंधुच्या शिवशक्तीची जाहीर प्रचार सभा झाली. याप्रचार सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी खासदार राजन विचारे, संजय राऊत, अविनाश जाधव, केदार दिघे आदी नेते उपस्थित होते.

Sanjay Raut
Mumbai Municipal Election Preparation: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 64 हजार कर्मचारी, 22 हजार पोलिस तैनात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news