Ramesh Mhatre Bail Cancelled: शिंदे सेनेचा हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा झटका

High Court doctor attack case latest news: दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या जामिनाला स्थगिती
Ramesh Mhatre
Ramesh Mhatre Pudhari
Published on
Updated on

Ramesh Mhatre bail cancelled by Bombay High Court

मुंबई: कल्याण दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयावरच शंका उपस्थित करत उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने डॉक्टरांवर हल्ला करणारा शिंदे शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन शनिवारी रद्द केला.

रमेश म्हात्रेच्या जामिनाची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि विशेष सुनावणी घेत दंडाधिकारी न्यायालयाने मंजूर केलेला त्याचा जामीन रद्द केला.

म्हात्रेने रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण जावे अन्यथा त्याच्या स्थावर मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही दिले जातील असा इशाराही खंडपीठाने दिला.

Ramesh Mhatre
Deputy Mayor Bungalow Controversy: उपमहापौरांनाही बंगला द्या! महापौरांच्या शिफारशींमुळे नव्या वादाला तोंड फुटले

कल्याण दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना नगरसेवक म्हात्रे आणि त्यांच्या अन्य चार साथीदारांना जामीन मंजूर केल्यानंतर राज्यातील डॉक्टरांनी सोमवारी राज्यव्‍यापी आरोग्य सेवा संप पुकारला आहे.

त्याची नोंद घेत प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठाने स्वतःहून (सुओमोटो) याचिका दाखल करून घेतली व शनिवारी दुपारी तातडीने विशेष सुनावणी घेत म्हात्रेला शरण येण्याचे आदेश दिले.

Ramesh Mhatre
Codeine Cough Syrup: मुंबईत कोडीनयुक्त कफ सिरपचा काळाबाजार; १५७ कफ सिरपच्या बाटल्या जप्त

एखाद्या नगरसेवकाने स्वतःसह चार जणांना सोबत घेऊन पालिकेच्या तीन डॉक्टरांवर हल्ला केला. हे प्रकरण गंभीर आहेच शिवाय दंडाधिकारी न्यायालयाने जामीन देताना म्हात्रेची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेतलेली नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news