Codeine Cough Syrup: मुंबईत कोडीनयुक्त कफ सिरपचा काळाबाजार; १५७ कफ सिरपच्या बाटल्या जप्त

अमली पदार्थविरोधी कक्षाची कारवाई
Codeine Cough Syrup
Codeine Cough SyrupPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई: मुंबईत कोडीनयुक्त कफ सिरपच्या आड सुरू असलेल्या बेकायदा मादक पदार्थांच्या व्यापारावर अमली पदार्थविरोधी कक्षाने मोठी कारवाई करत १ लाख ५७ हजार रुपये किमतीच्या १५७ कोडीन फॉस्फेट मिश्रित कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी आसिफ इक्बाल शेख (वय ३९) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटला पायधुनी परिसरात कोडीनयुक्त कफ सिरपची बेकायदा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून न्यू काझी स्ट्रीट येथील एका इमारतीवर छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून १५७ बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Codeine Cough Syrup
Koliwada Homestay: मुंबईच्या कोळीवाड्यांमध्ये आता पर्यटकांसाठी होम स्टे!

प्राथमिक कारवाईनंतर पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पुढील तपासासाठी प्रकरण अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटकडे वर्ग करण्यात आले. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क) आणि २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Codeine Cough Syrup
Mumbai Mega Block: उद्या मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे मेगा ब्लॉक

आणखी काही जणांचा सहभाग शक्य

तपासादरम्यान आरोपीला हा कोडीनयुक्त कफ सिरपचा साठा कुणाकडून मिळाला, तो आणखी कोणाला पुरवला जाणार होता आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news