

Ramdas Kadam On Anil Parab : योगेश कदम हे गेली तीन वर्ष टार्गेटवर आहेत. अनिल परब यांना योगेश कदम यांचा केवळ राजीनामा हवा आहे. ते धादांत खोटं बोलत आहेत, प्रेम नगरमधील मराठी माणसाला देशाधडीला लावणारे परब हे महाराष्ट्रात कदम कुटुंबीयांची बदनामी हा एक कलमी कार्यक्रम राबवत आहेत. माझा केबल व्यवसाय असल्याचे परब सांगतात;मग त्यांनी किती बोगस कंपन्या काढल्या, असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज (दि.९) केला.
पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम म्हणाले की, अनिल परब आपला केबलचा व्यवसाय असल्याचे सांगतात व्यवसाय. त्यांनी किती बोगस कंपन्या काढल्या सांग. वडिल, भाऊ, पत्नी, मुलगी यांच्या नावे काढल्या आहेत. त्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी अनिल परब हे ठाकरेंच्या सांगण्यावरुन बोलत आहेत. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मागील काही वर्ष माझे पुत्र योगेश कदम यांना टार्गेट केले जात आहे. केवळ बदनामी करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे."
उद्धव ठाकरेंचे अर्धवट वकील अनिल परब यांनी माझ्यावर केलेले आरोप अकलेचे दिवे पाजळले आहेत. योगेश कदम याला नेहमी टार्गेट केले. खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला ताकद दिली. योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून याची तक्रारही केली होती. योगेश कदम मंत्री झाल्याने आता परब यांना पोटशूळ उठले आहे. ३५ वर्षे झाला बार आहे. डान्सबार नव्हता. पैशांसाठी खालच्या लेवलवर जाणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रेम नगरमधील बिल्डर सुधारक शेट्टींनी अनिल परब यांना दोन मर्सिडिज कार दिल्या आहेत. प्रेमनगरमधील आठ हजार मराठी माणसांना अनिल परब यांनी फसवले. त्यांना फ्लॅट देत असे सांगत देशोधडीला लावले, या आरोपाचा पुन्नरुच्चारही कदम यांनी केला.
माझ्या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला, असा खोटा आरोप अनिल परब करत आहेत. या प्रकरणी माझ्या पत्नीने स्वत: माध्यमासमोर येवून खुलासा केला आहे. तिने माध्यमांसमोर वस्तुस्थिती सांगितले आहे. तरीही परब वारंवार तोच आरोप करत आमची बदनामी करत आहेत, असेही रामदास कदम म्हणाले.
हॅाटेल ड्रमबीड बार हा ठाकरे कुटुंबाचा आहे. आता तो का बंद आहे. लायसन्स रद्द झाले आहे. बाळासाहेबांची बदनामी होईल असं वक्तव्य मला करायचे नाही. ते माझे दैवत आहेत, असेही कदम म्हणाले.
घायवळ हे शिक्षक आणि बिल्डर आहेत. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नसेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेवू शकतो. तो काय तुला (परबांना) विचारून निर्णय घेणार का, असा सवालही कदम यांनी केला.विधिमंडळात असलेले मंत्र्यांना आदेश देणारे व्यक्ती यांनी योगेश कदम यांनी निर्णय घेतला आहे. त्यांचे नाव मुख्यमंत्री यांना पाठवले आहे. त्यांची शिफारस केल्यानंतर निर्णय घेतला, कदम म्हणाले.
मी आज कुणाचे नाव घेणार नाही. मी मुख्यमंत्री यांना कळवणार आहे. राज्यमंत्री यांना आदेश देणे बरोबर नाही. त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणं बरोबर नाही. नाव मी सांगणार नाही. योगेश कदम नाव सांगतील, असेही रामदास कदम म्हणाले.