Rajawadi Hospital Inspection Mumbai: राजावाडी रुग्णालयात महापौर रितू तावडे यांची अचानक पाहणी; रुग्णसेवा व स्वच्छतेवर दिले कडक निर्देश

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयमध्ये औषध पुरवठा, लसीकरण नोंदी व पुनर्विकास कामांचा आढावा; त्रुटींवर तातडीने कारवाईचे आदेश
Rajawadi Hospital Inspection Mumbai
Rajawadi Hospital Inspection MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शनिवारी अचानक भेट रुग्णसेवा व स्वच्छतेचा आढावा घेतला. रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या.

Rajawadi Hospital Inspection Mumbai
Farmer Suicide Affected Families: यवतमाळच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांची ‘चित्रनगरी’ सफर; संघर्षमय जीवनात आनंदाची नवी किरणे

औषध पुरवठा व वितरण, लसीकरणाचा पुरवठा व वितरण याची नोंदवही तपासून दैनंदिन व नियमितपणे लसीकरण होण्यासाठी संबंधितांना योग्य ती नोंद घेण्याचे निर्देश दिले. दूर्धर आजारामध्ये इंजेक्शनचा पुरवठा का होत नाही? याची माहिती महापौरांनी घेतली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक लावण्याचे निर्देशही अधिष्ठातांना यावेळी दिले.

Rajawadi Hospital Inspection Mumbai
Digital Transport Mumbai: मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक कार्यान्वित; शहरातील वाहतूक जाळे एका डिजिटल सूत्रात

राजावाडी रुग्णालयाचे पुनर्विकासाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यातील काम हे अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले असता, संबंधित अधिकाऱ्यांना महापौरांनी विचारणा केली.

Rajawadi Hospital Inspection Mumbai
Maharashtra Fort Conservation: सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट जपा; शिवरायांच्या इतिहासाचे बोलके साक्षीदार

रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बांधकामाचा संपूर्ण परिसर आच्छादित करण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. अन्नपुरवठ्यामध्ये थाळीचा दर्जा चांगला ठेवा, जुनी वायरिंग काढून नवीन टाका, रंगरंगोटी करा अशा काही महत्त्वपूर्ण सूचनाही यावेळी केल्या.

यावेळी स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी,प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (माध्यमिक आरोग्य सेवा ) डॉ.पवार, वैद्यकीय अधीक्षका डॉ. भारती राजूलवाला उपस्थित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news