Digital Transport Mumbai: मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक कार्यान्वित; शहरातील वाहतूक जाळे एका डिजिटल सूत्रात

एमएमआरडीए–जायका भागीदारीतून ओपन डेटा प्लॅटफॉर्म; एकाच अॅपवर तिकीट बुकिंग, लाईव्ह ट्रॅकिंग व स्मार्ट प्रवास नियोजन
Digital Transport Mumbai
Digital Transport MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल घडवण्याच्या उद्देशाने मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक कार्यान्वित करण्यात आला आहे. या माध्यमातून ओपन डेटा एक्सचेंज प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार असून मुंबईचे संपूर्ण वाहतूक जाळे एका सूत्रात बांधले जाणार आहे.

Digital Transport Mumbai
Maharashtra Fort Conservation: सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट जपा; शिवरायांच्या इतिहासाचे बोलके साक्षीदार

एमएमआरडीएने या पथदर्शी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीसोबत (जायका) भागीदारी केली आहे. जगभरातील शहरांना डेटा-आधारित वाहतूक व्यवस्था उभारण्यात मदत करणाऱ्या जायका डीएक्स लॅबचे या प्रकल्पाला सहकार्य लाभणार आहे.

Digital Transport Mumbai
Mumbai Aided School Teachers: अनुदानित शाळांतील शिक्षकांची सातवा वेतन आयोग थकबाकी रखडली; प्रस्तावच न पाठवल्याचा धक्कादायक प्रकार

बुधवारी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली महा मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, महा मुंबई मेट्रो आणि एमएमआरडीएचे उप महानगर आयुक्त अजिंक्य पडवळ यांनी जायकाच्या विज्ञान, तंत्रज्ञान माहिती आणि डिजिटल परिवर्तन कार्यालयाचे वरिष्ठ संचालक यामाडा टोमोयुकी आणि उपसंचालिका नायमुरा मालिको यांच्याशी सविस्तर चर्चा करून मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक हा उपक्रम सुरू केला.

Digital Transport Mumbai
Charkop Building Vibration: चारकोपमध्ये पायलिंग कामामुळे इमारतींना हादरे; व्हीजेटीआय पथकाची तातडीची पाहणी

मुंबई ट्रान्सपोर्ट स्टॅक ही एक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. याद्वारे सुरक्षित डेटा हायवेद्वारे जोडलेली एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. सामान्य प्रवाशांना एकाच ठिकाणाहून प्रवासाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे तिकीट बुक करता येईल. ट्रेन, बस आणि मेट्रोचे नेमके ठिकाण मोबाईलवर पाहता येईल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विविध वाहतूक साधनांचा वापर करून प्रवासाचे नियोजन सोपे होईल. पार्किंग उपलब्धतेची रिअल-टाईम माहिती मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news