

मुंबई : मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो, त्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी ते पक्ष सोडणे नव्हते, तर घर सोडणे होते. त्याला आता 20 वर्षांचा काळ लोटला, अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही उमजल्या. तो विषय आता सोडून द्या. कुठे आयुष्यभर कुंथत बसायचे, असे सांगत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जुने वाद सोडून पुढे जाण्याचा विचार शुक्रवारी मांडला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आणि त्यांचे परिवार एकत्र आले हेोते. शिवसेना ठाकरे गटाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे हे विशेष निमंत्रित होते. ठाकरे गटासह मनसेचे नेते आणि पदाधिकारी याप्रसंगी सभागृहात उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या वेळी मंचावर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अमित ठाकरे उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी जागवितानाच बाळासाहेबांची जन्मशताब्दी आगामी पिढ्यांना लक्षात राहील अशा कार्यक्रमांचे नियोजन वर्षभरात करण्याचा निर्धार राज यांनी यावेळी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवायचे ठरवले, तर उद्धव आणि मी तासन्तास बोलू शकतो. परंतु, ते नेमके कसे होते हे सांगणे कठीण काम आहे. बाळासाहेब नेमके कसे होते हे आम्हा घरातील लोकांना कळाले नाही तर जगाला कधीच कळणार नाहीत, असे सांगून 80 च्या दशकातील एक 20 वर्षांपूर्वीच्या वेदना वेगळ्या, ते घर सोडणे होते! तो विषय आता सोडून द्या.
आठवण सांगताना राज म्हणाले, या देशात हिंदू मतदार तयार करुन त्यांना हिंदुत्वासाठी मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा विचार बाळासाहेबांनी मांडला. त्यावेळी भाजपलाही हा विचार उमजला नाही, परंतु, बाळासाहेबांनी हिंदूंचा स्वाभिमान जागृत केला. हिंदुत्व ही एक राजकीय शक्ती असू शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिले. परंतु, बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या या शक्तीचा आज विचका झाला असून ते पाहून बाळासाहेबांना वाईट वाटले असते, या शब्दांत राज यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. 20 वर्षांपूर्वी मी शिवसेना सोडली, माझ्यासाठी तो क्षण पक्ष सोडण्याचा नाही तर घर सोडण्याचा होता. मात्र, त्याला आता बराच काळ लोटला, अनेक गोष्टी मला आणि उद्धवलाही कळाल्या. तो विषय आता सोडून द्या, असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार झाला आहे. एकेकाळी गावच्या चावडीवर उभे करून लोकांचा लीलाव केला जात असे, तोच प्रकार राजकारणात सुरू आहे. बाळासाहेबांनी घडवलेली माणसे आज अनेक पक्षांत दिसतात. मात्र, त्यांचे आजचे वर्तन पाहून बाळासाहेब ठाकरे कमालीचे व्यथित झाले असते.
राज ठाकरे