

Raj Thackeray
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक 'शिवतीर्थ' निवासस्थानी बोलावली आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त मोर्चाचे नियोजन तसेच आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी मनसेचे सर्व शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी बोलावून घेतले आहे. या बैठकीत १ नोव्हेंबर रोजीच्या मोर्चाची आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. या तातडीच्या बैठकीमुळे मनसेच्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात काय भूमिका घेतली जाणार आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.