Raj Thackeray: MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न सुटणार? राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा; म्हणाले, नोकरीसाठी...

Raj Thackeray MPSC Students: राज ठाकरे यांनी MPSC आंदोलक विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती दिली आहे.
Raj Thackeray MPSC Students
Raj Thackeray MPSC StudentsPudhari
Published on: 
Updated on: 

Raj Thackeray MPSC Students: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, या विषयावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आज राज ठाकरे यांनी दिली. तसेच, येत्या काही दिवसांत MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री या विषयावर सकारात्मक असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Raj Thackeray MPSC Students
Starlink India: स्टारलिंकला भारतात परवानगी का नाही? मस्क यांनी थेट अंबानींच नाव घेत विचारला प्रश्न; वादात राहुल गांधींची एन्ट्री

‘विद्यार्थ्यांच्या अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो’

राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ५ ऑक्टोबर रोजी पुण्यात MPSC आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांचे म्हणणे आणि त्यांच्या रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आज या विषयावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली.

नोकरीसाठी स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंबापासून दूर राहून मेहनत करणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मनाला वेदना होतात, अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा सकारात्मक झाली असून, लवकरच याबाबत चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray MPSC Students
Amravati Contractor Death: 'घनश्याम, मला माफ कर…', मृत्यूपूर्वी चिठ्ठीत काय लिहिलं? अमरावतीतील कंत्राटदाराच्या मृत्यूने खळबळ

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन

MPSC परीक्षार्थींचे पुण्यातील गांजवे चौकात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांनीही भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून, विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते पुढे येत आहेत.

कला आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे MPSC परीक्षार्थींच्या मागण्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.

विद्यार्थ्यांना आता निर्णयाची प्रतीक्षा

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिल्याने आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली असली, तरी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरकारच्या पुढील भूमिकेची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news