Raj Thackeray : "महाराष्ट्रात 'एसआयआर' संपूर्णपणे रद्द करा, मतदान बॅलेट पेपरवरच झाले पाहिजे" : राज ठाकरेंची 'गर्जना'

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ४० ते ६० लाख मतदार कसे वाढले
Raj Thackeray Garjana Morcha
मनसे प्रमुख राज ठाकरे.
Published on: 
Updated on: 

Raj Thackeray Garjana Morcha

"आजचा मोर्चा कशासाठी आहे हे सर्वांना माहिती आहे. मी २०१७, २०१८ या वर्षापासून सांगत आलोय की मतचोरी सुरू आहे. त्यावेळेस मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. त्यांना मतदान मशीन, मतदान याद्यांवर सांगितले होते. तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासही सांगितले होते. त्याशिवाय या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. मी त्यावेळेस काय बोलत होतो ते आता सर्वांना समजतंय. आता महाराष्ट्रात 'मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम' (एसआयआर) संपूर्णपणे रद्द झालाच पाहिजे. मतदान बॅलेट पेपरवरच झाले पाहिजे " अशी आग्रही मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (दि.४) केली.

महाराष्ट्रात ४० ते ६० लाख मतदार कसे वाढले?

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘विराट गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. महापालिकेसमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे म्‍हणाले,२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संपूर्ण बहुमत भाजप आणि शिंदेंना मिळाले. निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात जल्लोष नव्हता, शांतता होती. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांत ४० ते ६० लाख मतदार वाढले. हे कसे घडले, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray Garjana Morcha
SIR Voter Notice: निवडणूक आयोगाच्या नोटीसांमुळे मुंबईकर त्रस्त!

... तेव्हा तुम्ही कोठे जाणार?

तुम्ही सत्तेत बसलाय याचा आम्हाला राग नाही. मात्र तुम्ही सत्ता कशी चालवताय याचा आम्हाला राग आहे. मनमानी कारभार सुरू आहे. एकाच उद्योगपतीला देशातील जंगले, बंदरे दिली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला १ कोटी वाढीव मते मिळाली. निवडणूक आयोग आमच्याबरोबर असेल तर आम्ही आम्हाला वाटेल ते करू, असा राज्य आणि केंद्र सरकारचा कारभार सुरू आहे. चुकीच्या धोरणाचा हा भविष्यात पायंडा पडणार का? आज भाजप सत्तेत आहे, उद्या दुसरा पक्ष सत्तेत आल्यावर भाजपने केली तशीच सत्ता राबवली तर तुम्ही कोठे जाल, असा सवालही त्यांनी केला.

Raj Thackeray Garjana Morcha
Maharashtra SIR voter list: मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना जादा अधिकार द्या; चोकलिंगम यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news