Rahuri by Election: राहुरी पोटनिवडणूकही बिनविरोध होणार? अक्षय कर्डिले यांचा भाजपकडे दावा

बारामतीच्या पार्श्वभूमीवर राहुरीत राजकीय हालचाली; दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता
election news
election newsFile Photo
Published on
Updated on

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एकमताने निवडून द्यावे अशा हालचाली सुरू होणार हे उघड आहे. त्यामुळे आता राहुरी मतदारसंघातून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय यांनीही हाच न्याय लागू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपण निवडणुकीच्या

election news
Mumbai University: मुंबई विद्यापीठ सिनेट प्रश्नोत्तरावर वाद; ‘प्रशासनाचा स्वतःचाच अहवाल’ असल्याची टीका

मैदानात उतरण्यास इच्छुक आहोत, भाजपने आपल्याला वडिलांच्या जागी संधी द्यावी, असे विधान त्यांनी केले. भाजपमध्ये या संदर्भात काय हालचाली सुरू आहेत याचा अजून अंदाज आलेला नाही. मात्र कर्डिले यांच्या मुलाने दावा केल्याने तो मान्य करणे योग्य ठरेल. समान न्याय लावावा लागेल, असे मत एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.

election news
Board Exams Maharashtra: दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकारांवर कारवाई; 103 शिक्षक-कर्मचारी निलंबित

राहुरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे आणि तनपुरे घराण्याचे वारसदार एकेकाळी राज्यमंत्री असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी लढत दिली होती. कर्डिले यांच्या निधनानंतर या जागेवर बिनविरोध निवडणूक होऊ नये तर तेथे सामना व्हावा, असा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. राहुरी येथे एकमताने उमेदवाराला होकार देण्यापेक्षा ताकद

election news
Students Overseas Scholarships: चाळीस विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती

आजमावून पाहण्याचा विचार मविआमध्ये आहे. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर तेथील निवडणूक बिनविरोध होणार असेल तर राहुरीला वेगळा नियम लावण्यासाठी निश्चित कारणे शोधावी लागतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही बड्या व्यक्तींना या निवडणुकीत उतरायचे असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत या संबंधातील हालचालींना वेग येईल असे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news