

Haffkine Latest News
मुंबई : हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या खरेदी सेलने राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि आरोग्य संस्थांसाठी सरकारी दरांपेक्षा दोन ते पाच पट जास्त किमतीत औषध खरेदी केल्याचा आरोप आहे. या औषधांची किंमत एकूण 131 कोटी रुपये आहे.
हाफकिन प्रोक्योरमेंट सेलने जीवनरक्षक औषधांच्या खरेदीत मोठी अनियमितता दिसून येत आहे आणि सरकारी दरापेक्षा दोन ते पाच पट जास्त किमतीत ती खरेदी केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही किंमत वाढ सामान्य बाजारातील चढउतारांपेक्षा खूपच जास्त आहे. यामुळे आरोग्य सुविधांवर ताण आहे. जनतेच्या आरोग्य बजेटची सुनियोजित लूट आहे. याचा थेट परिणाम आरोग्य सुविधांवर होत असून गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळल्या जात आहे.
131 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करावी, जबाबदार अधिकार्यांवर फौजदारी कारवाई करावी आणि सर्व दोषी पुरवठादारांना तत्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर्सचे अध्यक्ष अभय पांडे यांनी केली.
माझीपेनेम 1 ग्रॅम इंजेक्शन, ज्याची किंमत पूर्वी 203.84 रुपये प्रति कुपी होती, ती 443.93 रुपयांना खरेदी करण्यात आली.
माझीपेनेम 500 मिलीग्राम इंजेक्शनची किंमत पूर्वी 53.76 रुपये होती. ती 227 रुपये प्रति कुपीला खरेदी करण्यात आली.
मेट्रोनिडाझोल 400 मिलीग्राम टॅब्लेट, ज्याची किंमत पूर्वी 0.65 रुपये प्रति कुपी होती, ती 1.1199 रुपयांना खरेदी करण्यात आली.
ओआरएस पावडर, ज्याची किंमत पूर्वी 1.99 रुपये प्रति पॅकेट होती, ती 10.74 रुपयांना खरेदी करण्यात आली.
सेफ्ट्रियाक्सोन सोडियम 1 ग्रॅम इंजेक्शन, जे पूर्वी 15.57 रुपयांना उपलब्ध होते, ते 50.72 रुपयांना खरेदी करण्यात आले.
अॅसायक्लोव्हिर 5% क्रीम (5 ग्रॅम ट्यूब), ज्याची किंमत 5.50 रुपये होती, ती 15.12 रुपयांना खरेदी करण्यात आली.
पाईपरासिलिन चार ग्रॅम प्लस टॅझोबॅक्टम 0.5 ग्रॅम इंजेक्शन, ज्याची जुनी किंमत 59.90 रुपये होती, ते 147.85 रुपयांना खरेदी करण्यात आले.