Maharashtra Politics: प्रशांत किशोर-राष्ट्रवादीच्या बैठकांवर भाजपची नाराजी

भाजपविरोधी राजकारण करणार्‍या प्रशांत किशोर यांच्यासोबतच महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीने चालविलेली सल्लामसलत भाजपला रुचलेली नाही.
Prashant Kishor
Prashant KishorPudhari
Published on
Updated on

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाने राजकीय सल्लागार म्हणून रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत चालविलेल्या वाटाघाटींवर भाजपने नाराजीचा सूर आळविला आहे. प्रशांत किशोर यांनी अलीकडेच बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव केला. भाजपविरोधी राजकारण करणार्‍या प्रशांत किशोर यांच्यासोबतच महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीने चालविलेली सल्लामसलत भाजपला रुचलेली नाही.

प्रशांत किशोर यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत झालेल्या मॅरेथाॅन बैठकीत राष्ट्रवादीच्या वाटचालीबाबत किशोर यांच्यासोबत वाटाघाटी झाल्याच्या चर्चा आहेत. किशोर यांची राजकीय रणनीतीकार म्हणून नेमणूक झाली की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Prashant Kishor
Zeeshan Siddique Threat: तुझ्या वडिलांना मारले, आता तुमची पाळी; आ. झीशान सिद्दीकी यांच्यासह बहिणीला धमकी

किशोर यांच्या नेमणुकीबाबत संभ्रम असला तरी भाजपच्या गोटात मात्र या सल्लामसलतीवर नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, राष्ट्रवादीने सल्लागार म्हणून प्रशांत किशोर यांना नेमले किंवा नाही याची मला काही कल्पना नाही.

त्यांच्या पक्षाने अधिकृतरित्या मला याबद्दल काही कळविलेलेही नाही. यासंदर्भात त्यांच्या पक्षाशी चर्चा केल्यानंतरच मी बोलेन असे स्पष्ट केले. तर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, निर्णय घ्यायचा राष्ट्रवादीला पूर्ण अधिकार असला तरी महायुतीत अविश्वास वाढेल अशी कोणतीही कृती टाळायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Prashant Kishor
Amit Shah Mumbai Visit: अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर; भाजप नेत्यांची बैठक आणि दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती

महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांना 'डॅमेज' न करण्याचा अलिखित संकेत असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news