

मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला पुन्हा धमक्या मिळू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांच्या बहिणीला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर झीशान सिद्दीकी यांच्याबाबतची धमकीची एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झीशान यांच्या बहिणीला इन्स्टाग्रामवर "तुझ्या वडिलांना मारले, आता तुमची पाळी" असा धमकीचा संदेश पाठवण्यात आला. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनसी (अदखलपात्र गुन्हा) नोंद करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणानंतर झीशान यांना यापूर्वीही धमक्या मिळाल्या होत्या.