Mahakarmi Digital Health Portal : वैद्यकीय देयकांचा निपटारा ‌‘महाकर्मी‌’द्वारे

दोन डिजिटल पोर्टल्सचा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ
Mahakarmi Digital Health Portal
मुंबई : ‌‘महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल‌’ आणि वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी ‌‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम‌’ या दोन डिजिटल पोर्टल्सचा शुभारंभ आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्ती प्रक्रियेला गती देण्यासाठी ‌‘महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल‌’ आणि वैद्यकीय मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी ‌‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम‌’ या दोन महत्त्वाच्या डिजिटल पोर्टल्सचा शुभारंभ आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, गेल्या अधिवेशनात दिलेले आश्वासन आरोग्य विभागाने पूर्ण केले आहे. ‌‘महाकर्मी‌’ हा कर्मचारी हिताचा डिजिटल निर्णय असून शासन आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रक्रिया ऑनलाईन व कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी देयकांमध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mahakarmi Digital Health Portal
Eknath Shinde : सभागृहातील आश्वासनांची महिन्यात पूर्तता

या प्रणालीमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता तत्काळ ओळखता येणार आहे. बदली, पदोन्नती व नवीन नियुक्त्या शास्त्रोक्त पद्धतीने राबविणे शक्य होईल. कागदोपत्री कामकाजातील विलंब टळून डेटा-आधारित मनुष्यबळ व्यवस्थापनामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

अचूक माहिती उपलब्ध होणार

‌‘महाकर्मी‌’ पोर्टलचे वैशिष्ट्य‌‘महाराष्ट्र कर्मचारी रुग्णमित्र‌’ या संकल्पनेवर आधारित ‌‘महाकर्मी‌’ पोर्टलद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती ऑनलाईन अर्जाद्वारे करता येणार आहे. अर्ज सादर व निपटारा पूर्णपणे डिजिटल, निश्चित कालमर्यादेत प्रक्रिया, कार्यालयीन दिरंगाईत घट, पारदर्शक व सुसूत्र प्रणालीद्वारे मनुष्यबळ व्यवस्थापन, सक्षम ‌‘वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम‌’ या पोर्टलमुळे राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदनिहाय, जिल्हानिहाय आणि विशेषज्ञनिहाय अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.

Mahakarmi Digital Health Portal
BMC Budget 2026 : आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news