Nanded-Hyderabad Route Accident : डॉक्टर अन् आरटीओ अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचले युवकाचे प्राण

नांदेड-हैदराबाद मार्गावर भीषण अपघात
Nanded-Hyderabad Route Accident
Nanded-Hyderabad Route Accident : डॉक्टर अन् आरटीओ अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे वाचले युवकाचे प्राणfile photo
Published on: 
Updated on: 

Young man's life saved thanks to the prompt action of a doctor and an RTO official

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : नांदेड-हैदराबाद महामार्गावर रविवारी (दि. १८) दुपारी कृष्णूर शिवारात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र, त्याच वेळी घटनास्थळावरून जाणाऱ्या एका सतर्क डॉक्टराने जागेवरच उपचार करत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्याने स्वतःच्या शासकीय वाहनातून रुग्णालयात पोहोचवत मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या युवकाचे प्राण वाचवले. या घटनेमुळे संकटाच्या प्रसंगी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडले आहे.

Nanded-Hyderabad Route Accident
Atul Save : पिण्याच्या पाण्यासाठी काटेकोर नियोजन करा

खैरगाव येथील विनोद कबीरदास बैलकवाड (वय २९) हा युवक दुचाकीने (एमएच २६ सीजी ८४२५) नांदेडकडे जात असताना, कृष्णूर शिवारात अचानक चक्कर आल्याने त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली. धडक इतनी भीषण होती की, युवक उडून रस्त्यावर पडल्याने जागीच बेशुद्ध झाला.

याच वेळी नांदेडहून नायगावकडे कारने निघालेले डॉ. अविनाश पांढरे कोठाळकर, राजू पाटील बोरवाले आणि यशवंत शिंदे यांनी हा प्रकार पाहताच गाडी थांबवली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाची बिकट अवस्था पाहून डॉ. कोठाळकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळीच छातीवर दाब देत प्राथमिक उपचार सुरू केले. काही वेळातच युवक शुद्धीवर आला आणि त्याने 'साहेब, मला दोन लेकरं आहेत, मला वाचवा!' अशी आर्त विनवणी केली, ज्यामुळे उपस्थितांचे मन हेलावून गेले.

Nanded-Hyderabad Route Accident
Nanded Crime News : नांदेडमध्ये ब्राऊन शुगरसह दोघे जेरबंद; गुन्हे शाखेची धडक कारवाई

दरम्यान, रुग्णवाहिकेची वाट न पाहता नांदेडहून देगलूरकडे जाणारे आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक दिनेश पाटील व चालक प्रकाश जायभाय यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी आपले शासकीय वाहन थांबवून जखमी युवकाला डॉ. कोठाळकर यांच्यासह तत्काळ नायगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

गावकऱ्यांकडून आभार

आजच्या काळात अपघातानंतर व्हिडिओ काढणाऱ्या गर्दीपेक्षा वेळेत मदत मिळणे किती मोलाचे असते, याची अनुभूती या घटनेने दिली आहे. डॉक्टर आणि आरटीओ अधिकाऱ्यांच्या या समयसूचकतेमुळे युवकाचा जीव वाचल्याने खैरगाव ग्रामस्थांनी दोघांचेही शतशः आभार मानले असून, परिसरात त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news