Nanded Crime News : नांदेडमध्ये ब्राऊन शुगरसह दोघे जेरबंद; गुन्हे शाखेची धडक कारवाई

तीन लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त; पंजाबमधील तस्करांकडून माल आणल्याची कबुली
Nanded Crime News
Nanded Crime News : नांदेडमध्ये ब्राऊन शुगरसह दोघे जेरबंद; गुन्हे शाखेची धडक कारवाईfile photo
Published on: 
Updated on: 

Two arrested with brown sugar in Nanded; swift action by the Crime Branch

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर-विवेकनगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चोरट्या मार्गान अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६२ ग्रॅम वजनाची 'ब्राऊन शुगर' (चिटा) व ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीनगर, विवेकनगर येथील आशिष किराणा दुकानाजवळ सिमेंट रोडवर दोन इसम बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने थांबले आहेत.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या ब्राऊन शुगरची अवैध विक्री करणाऱ्या आरोपीसह (बसलेले) पोलिस पथक. आधारे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन यांची रीतसर परवानगी घेऊन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वात छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही अवगत करण्यात आले. शासकीय पंच, वैधमापन शास्त्र विभागाचे राजपत्रित अधिकारी आणि पोलीस पथकासह दुपारच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकण्यात आला.

छापा टाकल्यानंतर वर्णनाप्रमाणे

दोन संशयित इसम आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे गुरबिरसिंग हरपालसिंग संधु (वय ५० वर्षे, रा. तरण तारण, पंजाब, सध्या रा. श्रीनगर, नांदेड) आणि जनार्दन गोविंदराव सोनटक्के (वय ३० वर्षे, रा. ब्राम्हणवाडा, ता. जि. नांदेड) असल्याचे सांगितले.

राजपत्रित अधिकारी व शासकीय पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या खिशात ६२ ग्रॅम वजनाची ब्राऊन शुगर मिळून आली. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्सच्या सहाय्यक रासायनिक विश्लेषकांकडून खात्री केल्यानंतर हा माल जप्त करण्यात आला. आरोपींनी हा माल पंजाबमधील 'निक्का व बंटी' यांच्याकडून आणल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे धडाडीचे पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सपोनि रवी वाहुळे, पोउपनि बळीराम दासरे आणि पथकातील अंमलदार दारासिंग राठोड, गुंडेराव करले, रितेश कुलथे, दिलीपकुमार चंचलवार, उमर शेख, सुनिल गटलेवार, मोतीराम पवार, सिध्दार्थ सोनसळे, तसेच शासकीय फोटोग्राफर नरेद्र राठोड, वैधमापन शास्त्र निरीक्षक ब्रम्हानंद सावते आणि फॉरेन्सिक विभागाचे राजेश पांचाळ, वेदांत नगनुरवार यांनी पार पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news