Sharad Pawar: पार्थ पवार 'सिल्व्हर ओक'वर गेले खरं, आजोबा-नातवाची भेटच झाली नाही; शरद पवारांनी भेट टाळली? नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात येईल का याबद्दल जोरदार चर्चा सुरू असतानाच या कल्पनेला विरोध करणारे पार्थ पवार शनिवारी 'सिल्व्हर ओक'वर गेले.
Parth Pawar Sharad Pawar meeting
Parth Pawar Sharad Pawar meetingFile Photo
Published on: 
Updated on: 

Parth Pawar Sharad Pawar meeting

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात येईल का याबद्दल जोरदार चर्चा सुरू असतानाच या कल्पनेला विरोध करणारे पार्थ पवार शनिवारी 'सिल्व्हर ओक'वर गेले होते. मात्र यावेळी पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलीच नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

शनिवारी शरद पवार यांच्या निवासस्थानी नाट्यमय घटना घडल्या. शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या गटाचे प्रमुख नेते हजर असतानाच अजित पवार राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार तेथे दाखल झाले. आजोबा शरद पवार यांची तब्येत पाहायला ते गेले होते.

शरद पवारांनी भेट टाळली?

सिल्वर ओकवर गेल्यानंतर पार्थ पवारांनी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आजोबा आणि नातवामध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. पार्थ पवार शरद पवार यांची भेट न घेताच निघून गेल्याचे समजते. पार्थ पवार सिल्वर ओकवर आले त्यावेळी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, डॉ. अमोल कोल्हे, अनिल देशमुख हे उपस्थित होते. या बैठकीमुळेच पार्थ पवार हे फक्त प्रतिभा पवार यांनाच भेटून सिल्वर ओक मधून निघून गेले. त्यामुळेच पार्थ पवार आणि शरद पवार यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

विलीनीकरणावर मौन

शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी विलीनीकरणाबद्दल मौन बाळगले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांनी विलीनीकरण या विषयावर आता आडून किंवा सरळ कोणतेही विधान करू नका असे सांगितले आहे.

दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणास शरद पवार गटातील काही मंडळी अनुकूल असताना अजित पवार यांचे पुत्र आणि त्यांचे राजकीय वारसदार होऊ बघणारे पार्थ पवार संपूर्णतः प्रतिकूल असल्याचे मानले जाते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघेही या विलीनीकरणाच्या विरोधात असून आता दोन्ही पक्ष वेगळे झाले असल्याची भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडलेली आहे.

Parth Pawar Sharad Pawar meeting
Sonia Gandhi on Emergency : "केवळ संजय गांधीच जबाबदार नव्हते"; सोनिया गांधी आणीबाणीबद्दल नेमकं काय म्हणाल्या?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.