

कळंबोली : पनवेल महापालिकेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाच्या दिवशी भरघोस मतदान व्हावे यासाठी पनवेल महापालिकेने महापालिका क्षेत्रातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यां मार्फत पालकांना पत्र लेखनातून आर्त साद दिली आहे.यामध्ये आई-बाबा मतदानाची दिवशी वेळ काढून मतदान करा असे अर्थपुर्ण बोलही आपल्या पालकांना पत्रातून सुनावले आहेत.
महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाच पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदारांनी स्वागत करून महापालिकेचे अभिनंदन केले आहे.पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात स्विपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे पाल्यांमार्फत पालकांना साद भावनिक साद दिली आहे.
तर अशा अभिनव उपक्रमासोबतच महापालिकेमार्फत अन्यही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांना सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे.यात प्रामुख्याने विविध महत्त्वाच्या चौकांमधून मतदान विषयक जनजागृती करण्यात आल्या आहेत.पालक या अभियानाला कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलेआहे.
विद्यार्थी आपल्या घरी जाऊन आपल्या आई-वडिलांना देतील आणि त्यांच्याकडून मतदान करणारच अशी हमी घेतील. निश्चितच या उपक्रमाद्वारे मतदान जनजागृती होऊन पनवेल महानगरपालिकेची यावेळी मतदान टक्केवारी वाढेल
मंगेश चितळे, आयुक्त
1 लाख विद्यार्थ्यांमार्फत आवाहन पत्र
पनवेल महानगरपालिका हद्दीतील मनपा व इतर महत्त्वाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून उपरोक्त पत्र देण्याचा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना निवडणुकीत मतदान करण्याबाबत विनंती असा संदेश असलेले पत्र त्यांच्याकडे देण्यात येत असून त्यांनी आपल्या पालकांकडून निवडणुकीत मतदान करण्याबाबत आश्वासन घ्यावयाचे आहे. अशा प्रकारचा संदेश जवळपास 75 शाळांमधून 1 लाख मुलांच्या मार्फत पालकांपर्यंत पनवेल महानगरपालिका पाठवीत आहे.