Pandharpur bhajani instruments : पंढपुरात वारकऱ्यांसाठी सजली भजनी साहित्याची दुकाने

साहित्याच्या विक्रीतून होते तीन कोटींची उलाढाल; आषाढीत टाळ, पेटींना मोठी मागणी
Pandharpur bhajani instruments
Pandharpur bhajani instrumentsfile photo
Published on
Updated on

मुंबई : स्वप्निल कुलकर्णी

टाळ वाजे, मृदंग वाजे,

वाजे हरीची वीणा,

माऊली निघाले पंढरपुरा,

मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ||

असा जयघोष करत पालख्या, दिंड्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या आहेत. या दिंडीचा आत्मा असतो वीणा, पखवाज आणि मृदूंग आणि त्याला साथ मिळते शेकडो टाळांची. या तीनही भजनी वाद्यांच्या नादामुळे सध्या पंढरीचा मार्ग अक्षरश: दुमदुमून गेला आहे. आषाढी वारी निमित्त पंढरीतही प्रदक्षिणा मार्ग, वीणे गल्लीतील दुकाने टाळ, पखवाज, विणा, पेट्या आदी भजनी साहित्याच्या खरेदीसाठी सजली आहेत. भजनी साहित्याच्या विक्रीतून दरवर्षी दोन ते तीन कोटींची उलाढाल होत असल्याचे भजनी साहित्य विक्रेते सांगतात.

पंढरपूरमध्ये भजनी साहित्य विक्रीची बारा ते पंधरा दुकाने आहेत. पंढरीतील टाळांचे व्यावसायिक श्याम गंजेवार यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले की, आमच्याकडे टाळ आणि झांज बनवल्या जातात. त्याची तयारी वर्षभर सुरू असते.

Pandharpur bhajani instruments
Mumbai–Pune Expressway Traffic | महामार्गावरील कोंडीचा धडा

लहान आणि मध्यम, मोठे अशा तीन प्रकारात टाळ उपलब्ध आहेत. मध्यम आकाराच्या टाळांना आणि झाजाना वारकऱ्यांकडून मोठी मागणी असते. कच्च्या मालावर प्रक्रिया करून टाळ बनवले जातात. टाळांची आणि झंजांची किंमत शंभर रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले.

वारकऱ्याला खरेदी करायला लागणारे टाळाचे उत्पादन अहमदनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होत असते. यात्रेपूर्वी या भागात हजारोंच्या संख्येने टाळाच्या धातूच्या वाट्या नगरमधून पंढरपूरला येतात. हे टाळ कास आणि पितळ असे दोन मुख्य धातूचे बनलेले असतात.

दिंडीमधील वारकरी साधारणत: ७०० ते ८०० ग्रॅम वजनाचे टाळ वापरतात. या टाळांच्या वाट्यांना खिळे आणि मणी बसवून येथील व्यापारी गळ्यात अडकविण्यासाठी पट्टे जोडून विक्रीला तयार ठेवतात. टाळांच्या दोन्ही वाट्यामधून खिळा बसवून त्याला मणी लावून हुकात हे पट्टे अडकविले जातात.

Pandharpur bhajani instruments
Nashik grape exporters crisis : युद्धामुळे दोनशे कोटींच्या द्राक्षनिर्यातीला ब्रेक

वाद्यांसाठी उत्तर प्रदेशातून येतो लाकूड

टाळासोबत पंढरपूरमध्ये बनलेल्या वीणा आणि पखवाज या वाद्यांना आषाढीत मोठी मागणी असते. ही वाद्ये तयार करण्यासाठी सागवानी, महाडिकाच्या लाकडाचा वापर केला जातो. हे लाकूड उत्तर प्रदेशमधून येते. याच्या आकारावरून पखवाज आणि मृदूंग हे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात. लोखंडी पखवाज वजनाला जास्त असल्याने सध्याच्या काळात याचा वापर केवळ कीर्तनात आणि बैठ्या कार्यक्रमात केला जातो. वीणा ८ इंच ते १६ इंच प्रकारात उपलब्ध होतात.

पांडुरंगाच्या नगरीतून भजनी साहित्य घेणे हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने भाग्याचे मानले जाते. त्यामुळे पंढरपूरमध्ये भजनी वाद्यांची लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते. टाळ, पखवाज, वीणा आणि इतर प्रकारच्या वाद्यांना वर्षभर मागणी असल्याने बारा महिने गरजेनुसार वाद्यांचे उत्पादन सुरू असते. आषाढी यात्रा काळात जवळपास एक कोटींची उलाढाल होत असते.

राजेश भोसेकर, भजन साहित्य विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news