Mumbai Drugs Case | 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ऑरीला मुंबई पोलिसांचे समन्स; आज दुपारी चौकशी

Mumbai Drugs Case | मुंबईत 252 कोटी रुपयांच्या मोठ्या ड्रग्ज घोटाळ्याने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. या प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखला जाणारा ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स जारी केले आहेत.
Mumbai Drugs Case
Mumbai Drugs Case
Published on
Updated on

मुंबईत 252 कोटी रुपयांच्या मोठ्या ड्रग्ज घोटाळ्याने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. या प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखला जाणारा ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स जारी केले आहेत. अँटी नार्कोटिक्स सेलच्या तपासात नवीन धागेदोरे मिळाल्यानंतर ऑरीला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai Drugs Case
Spirit Movie | संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटात मोठे ट्व‍िस्‍ट, रणबीरनंतर आता 'या' साऊथ स्टारची एन्ट्री, प्रभाससोबत २ स्टार्सची तगडी टक्कर!

अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटकडून ऑरीला पाठवलेल्या नोटीसमध्ये आज दुपारी १ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे, कारण ऑरी हा सेलिब्रिटी पार्टी कल्चर, इव्हेंट्स आणि महागड्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत राहणारा परिचित चेहरा आहे.

या प्रकरणाचा थेट संबंध एक मोठ्या प्रमाणात पकडलेल्या ड्रग्ज कन्साइनमेंटशी आहे. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख नावाच्या आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तो देशात आणि परदेशात उच्चभ्रू लोकांसाठी खासगी ड्रग्ज पार्ट्या आयोजित करत असे. या पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

तपास अधिक वाढवल्यानंतर आरोपीने काही महत्त्वाची नावे पोलिसांसमोर घेतल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये ऑरीचे नावही असल्याचे समोर आले. या माहितीची सत्यता तपासण्यासाठीच अँटी नार्कोटिक्स सेलने ऑरीला अधिकृतरीत्या चौकशीसाठी बोलवले आहे.

Mumbai Drugs Case
Celina Jaitly : १४ वर्षांनंतर संसारात मीठाचा खडा! सेलिनाचे पतीवर घरगुती हिंसाचार, शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप

ऑरी हे नाव गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर अतिशय प्रभावी ठरले आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत त्याचे जवळचे संपर्क, मोठमोठ्या पार्ट्या, विदेशातील इव्हेंट्स आणि अचानक वाढलेली प्रसिद्धी यामुळे तो वारंवार चर्चेचा विषय ठरत असतो. त्यामुळेच पोलिसांनी त्याला समन्स बजावल्याने या प्रकरणाकडे अधिकच लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने वळतो, ऑरीने सहभाग नाकारला की काही महत्त्वाच्या गोष्टी कबूल केल्या, हे सर्व तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अँटी नार्कोटिक्स सेल या प्रकरणात कोणतीही ढिलाई न ठेवता सर्व संबंधित व्यक्तींवर लक्ष ठेवून तपास सुरू ठेवत आहे.

या मोठ्या ड्रग्ज जाळ्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. कारण आरोपी मोहम्मद सलीम परदेशातील ड्रग्ज पुरवठादारांशी थेट संपर्कात असल्याचा संशय आहे. या सर्व चौकशीतून पोलिसांना काही अधिक मोठी नावेही मिळू शकतात, अशी चर्चा आहे.

सध्यातरी ऑरीने या समन्सवर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावर मात्र याबाबत विविध चर्चा आणि मीम्सची रेलचेल सुरू झाली आहे. परंतु पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news