मुंबई : मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड, पालघर या प्रमुख जिल्ह्यांत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्धच होत नाही. या जिल्ह्यांऐवजी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारितील कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, पनवेल व नवी मुंबई भागात ही वसतिगृहे स्थलांतरित करून सुरु केली जाणार आहेत.
राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेची मुला-मुलींची स्वतंत्र शासकीय वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. 36 जिल्ह्यांमध्ये 72 वसतिगृहे भाडेतत्त्वावर इमारती घेऊन कार्यान्वित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. सध्या राज्यात 62 वसतिगृहे सुरू झाली. मात्र, या भागात वसतिगृहासाठी इमारतीच उपलब्ध नसल्याने वसतिगृहे सुरू होण्यास अडथळे येत होते.
ही वसतिगृहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील इतर भागांमध्ये म्हणजेच कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, पनवेल, नवी मुंबई आदी ठिकाणी स्थलांतरित करून सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.