NSEL Scam Investor Refund: १३ वर्षांनंतर एनएसईएल गुंतवणूकदारांना दिलासा; १,९५० कोटींचा परतावा मिळणार

एकरकमी तडजोड योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना दिलासा; परतावा मिळाला तरी आरोपींवरील फौजदारी कारवाई सुरूच राहणार
NSEL Scam Investor Refund
NSEL Scam Investor RefundPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडच्या (एनएसईएल) आर्थिक गैरव्यवहारामुळे आर्थिक फटका सोसावा लागलेल्या हजारो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या एनएसईएल प्रकरणातील ५ हजार ८६२ गुंतवणूकदारांना एकरकमी तडजोड योजनेअंतर्गत (ओटीएस) १ हजार ९५० कोटी रुपयांचा परतावा देण्यात येणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना परतावा देण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत एनएसईएल प्रकरणातील गुंतवणूकदारांना परतावा दिला जाणार असल्याबाबतची माहिती दिली. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना आर्थिक परतावा देण्याची ही घटना ऐतिहासिक असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

NSEL Scam Investor Refund
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरून 'सिटीफ्लो'ची मोफत बससेवा बंद; विमानातून उतरल्यानंतरच्या प्रवासाचे सर्व पर्याय आता पेड

मात्र, गुतंतवणूकदारांना परतावा मिळाला म्हणून एनएसईएल घोटाळ्यातील आरोपींची सुटका होणार नाही. आरोपींच्या विरोधातील फौजदारी कारवाईची प्रक्रिया कायद्यानुसार सुरूच ठेवावी, असे निर्देशही त्यांनी गृह विभागाला दिले.

एनएसईएल घोटाळ्यामुळे देशभरातील १२ हजार ७३५ गुंतवणूकदारांचे सुमारे ५ हजार ४०३ कोटी रुपये अडकले होते. त्यानंतर एक्स्चेंजमधील व्यवहार बंद करण्यात आले. हा घोटाळा जुलै २०१३मध्ये उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सरकारने या प्रकरणात घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या निकालाला गती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

NSEL Scam Investor Refund
Mumbai Naval Dockyard Security Case: नेव्हल डॉकयार्डची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित; २१ वर्षीय प्रशिक्षणार्थीला अटक

या प्रकरणातील सर्व लहान गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीची १०० टक्के रक्कम परत मिळाली आहे. तसेच, मोठ्या गुंतवणूकदारांपैकी ९२ टक्के गुंतवणूकदारांनी ओटीएस स्वीकारण्यास मतदानाद्वारे संमती दिली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभाग, आर्थिक गुन्हे शाखा आणि सक्षम प्राधिकरणाचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.