Mumbai Naval Dockyard Security Case: नेव्हल डॉकयार्डची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित; २१ वर्षीय प्रशिक्षणार्थीला अटक

पाकिस्तानस्थित हँडलर्सशी संपर्काचा संशय; इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप चॅट्सची तपासणी
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईतील अतिसंवेदनशील नेव्हल डॉकयार्ड तसेच भारतीय नौदलाच्या अन्य महत्त्वाच्या आस्थापनांची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून कुलाबा पोलिसांनी बंटी रामप्रकाश मीणा (२१) या प्रशिक्षणार्थीला अटक केली आहे.

राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मीणाच्या सोशल मीडिया खात्याचा पाकिस्तानस्थित हँडलर्सशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणामुळे नौदलाच्या संवेदनशील आस्थापनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Arrested
Belapur Court Incident: जन्मठेप सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; आरोपीचा मृत्यू

मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया डिजिटल लॅबला इन्स्टाग्रामवरील एका खात्यावरून नौदलाच्या संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित होत असल्याची माहिती मिळाली होती. तांत्रिक तपास आणि डिजिटल निरीक्षणाच्या आधारे संबंधित खात्याचा वापर बंटी मीणा करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपीविरुद्ध अधिकृत गुपिते कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप खात्यांमधील संदेश, संभाषणे तसेच अन्य डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.

Arrested
Mumbai BMC Fixed Deposits: मुंबई महापालिकेच्या ठेवी ११ हजार कोटींनी घटल्या, भाजपची सत्ता येताच तिजोरीला गळती; काॅंग्रेसचा आरोप

त्याने ही छायाचित्रे व व्हिडीओ नेमके कोणाला पाठविले, त्यामागे आर्थिक व्यवहार किंवा परदेशातून सूचना होत्या का, याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.