Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरून 'सिटीफ्लो'ची मोफत बससेवा बंद; विमानातून उतरल्यानंतरच्या प्रवासाचे सर्व पर्याय आता पेड

चलो बसनंतर सिटीफ्लोनेही सेवा थांबवली; प्रवाशांसमोर आता सशुल्क प्रवासाचे पर्याय
Navi Mumbai Airport
Navi Mumbai AirportPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: नवीमुंबई आणि मुंबई विमानतळा दरम्यान प्रवास करणाऱ्या हवाई प्रवाशांना आता मोफत शटल सेवेला मुकावे लागणार आहे. नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-२ (टी-२) शी जोडणारी, ॲप-आधारित प्रीमियम प्रवासी वाहतूक कंपनी 'सिटीफ्लो'ची मोफत शटल सेवा बंद करण्यात आली आली असून, आतापर्यंत मोफत असलेल्या या प्रवासासाठी आता एक ना अनेक पेड पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

यापूर्वी 'चलो बस'नेही दोन्ही विमानतळांदरम्यानची आपली मोफत शटल सेवा बंद केली होती. आता 'सिटीफ्लो'नेही सेवा थांबवल्याने प्रवाशांसाठीचे दोन्ही मोफत पर्याय संपुष्टात आले आहेत. याचा परिणाम नवीमुंबई विमानतळावर या मोफत बसेसने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चावर आणि नियोजनावर होणार आहे.

Navi Mumbai Airport
Belapur Court Incident: जन्मठेप सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी; आरोपीचा मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या'सिटीफ्लो'च्या मोफत शटल सेवेला हवा तसा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नव्हता. शिवाय बहुतांश मोफत शटल सेवांची जागा आता सशुल्क बस सेवांनी घेतली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता सार्वजनिक फिडर बस किंवा खासगी ॲप-आधारित बस सेवांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मोफत शटल सेवा बंद झाली असली, तरी नवी मुंबई आणि मुंबईतील प्रमुख भागांत जाणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित आणि ॲप-आधारित वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत.

Navi Mumbai Airport
Mumbai BMC Fixed Deposits: मुंबई महापालिकेच्या ठेवी ११ हजार कोटींनी घटल्या, भाजपची सत्ता येताच तिजोरीला गळती; काॅंग्रेसचा आरोप

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून सर्वसामान्य तिकीट दरात नियमित फिडर बस सेवा चालवली जाते. या बसेस विमानतळावरून बेलापूर, नेरूळ, खारकोपर, तरघर, पनवेल आणि खांदेश्वर अशा प्रमुख भागांना थेट जोडतात.

'चलो बस'कडून स्वतःची सशुल्क ॲप-आधारित बस सेवा सुरूच ठेवण्यात आली आहे. या बसेस प्रवाशांना मुंबईतील अंधेरी, वांद्रे आणि कुलाबा यांसारख्या प्रमुख केंद्रांशी थेट जोडतात.

याशिवाय ठाणे महापालिका परिवहन सेवा पेड स्वरूपात नियमित सुरू असून, आर्या ट्रान्स सोल्युशनची बससेवाही सायन आणि ठाणे मार्गे पैसे मोजून वापरता येईल.

उबर, ऑल माईल्स कॅब, भारती टॅक्सी, अलाइट टॅक्सी, ओला टॅक्सी, रॅपिडो, एरो लिंक सह दहा प्रकारच्या टॅक्सी नवी मुंबई विमानतळावरून महामुंबई प्रदेशातील सर्व ठिकाणी मीटरने धावत आहेत. हे सर्व पर्याय उपलब्ध असल्याने नवी मुंबई विमानतळाची कनेक्टिव्‍हिटी वृद्धिंगतच झाल्याचा दावा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.