Mumbai News | उत्तर मुंबईतील ठाकरे सेनेचा गड ढासळू लागला

North Mumbai Politics | अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला
North Mumbai Politics
उध्दव ठाकरे यांना धक्का (File Photo)
Published on
Updated on

North Mumbai Politics

मुंबई : उत्तर मुंबईवरील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पकड कमी होत चालली असून, गेल्या काही महिन्यांत दहिसर आणि मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सध्या या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेचे आमदार आहेत. मुंबईतील अन्य भागांप्रमाणेच या भागातही ठाकरे सेनेस नव्याने उभारी घेण्यासाठी नवीन व्यूहरचना, नवीन नेतृत्व व कार्यकर्ते यांचीफळी उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

मागठाणे मतदारसंघात काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी, प्रवक्त्‌या संजना घाडी यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर दहिसर मतदारसंघातील माजी नगरसेवक हर्षद कारकर यांनीही शिंदे गटाची वाट धरली.

North Mumbai Politics
Mumbai Political News : उत्तर मुंबईत ठाकरे गटाला आणखी एक धक्का? माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा

अशा कठीण परिस्थितीतही मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाने काही महिन्यांपूर्वी पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करत केलेल्या फेरबदलांचे पडसाद अद्याप थांबलेले नाहीत. यात मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील दहिसर पूर्वेतील रावळपाडा शाखा क्रमांक ३ आणि ४ येथील उपविभागप्रमुख राजू मुल्ला यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची पदे काढून घेतली होती. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा होती. तरीही उबाठा पक्षाशी निष्ठावंत राजू मुल्ला यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षात न जाता पक्षनिष्ठा कायम ठेवली आहे. मात्र, ठाकरे सेनेकडून त्यांना पूर्ववत पद देण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. पक्षास गळती लागलेली असताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना मानसन्मान देण्याची अपेक्षा चुकीची नसल्याचे कार्यकर्ते सांगतात.

North Mumbai Politics
Mumbai News | वाढवण बंदराजवळ वसवणार चौथी मुंबई !

गेली ३० वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य करताना मुल्ला यांच्यावर २०१५ मध्ये प्रभाग क्र. ४ चे शाखाप्रमुख आणि २०२१ मध्ये उपविभागप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या राजू मुल्ला नवतरुण गणेशोत्सव मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. आता माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असताना देखील तेजस्वी घोसाळकर यांनी हे पाऊल उचलले. मुंबई महानगरपालिका निवडणूक काही महिन्यांवर असताना तेजस्वी घोसाळकर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उत्तर मुंबई हा उबाठा पक्षाचा नेहमीच गड राहिला होता. मुंबई महापालिकेत उत्तर मुंबईतून मोठ्याप्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहेत. दहिसरमधून हरेश्वर पाटील, डॉ. शुभा राउळ यांनी मुंबई महापालिकेत महापौरपद भूषवले होते. असे असतानाही उत्तर मंबईत ठाकरे सेना अडचणीत आलेली दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news