Ashish Shelar : 'बहिणीच्या नावावरील प्रॉपर्टीला स्टॅम्प ड्युटी नाही, प्रस्ताव विचाराधीन' : मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा

ठाकरे बंधूचे एकत्र येणे हा कौटुंबिक विषय, उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारणातील विशेषज्ञ
Ashish Shelar
Ashish Shelar | मंत्री आशिष शेलारांकडून नामदेव ढसाळ यांचा अवमान File Photo
Published on
Updated on
Summary

पालकमंत्री आशिष शेलार यांनी यांनी आज वांद्रे परिसरात अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी त्‍यांनी सरकारी योजनांची माहिती देत महाविकास आघाडीवर टीका केली.

Ashish Shelar On Stamp Duty

मुंबई : गेली १७ वर्ष सतत आरोग्य सेविका, आशावर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी करतोय. आपण या विभागात खूप योजना आणल्या आहेत. याचा लाभ साडेबारा हजार पात्र बहिणींना लाभ मिळाला आहे. आता बहिणीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याला आता स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार नाही, याचा आम्ही विचार करतोय, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी आज (दि. २३) दिली.

मानधन किती त्यापेक्षा भावना महत्त्वाच्या

वांद्रे परिसरात पालकमंत्री आशिष शेलार यांनी अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आणि आशा वर्कर यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. यावेळी ते म्हणाले, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली. मात्र मागील १७ वर्षांपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहात. आरोग्य सेविका, आशावर्कर यांनी कोरोना काळात घरोघरी जाऊन गर्भवती बहिणीची आणि नवजात बालकांची जबाबदारी घेतली. स्वतःचा जीव हातात घेऊन या काळात तुम्ही जबाबदारी पार पाडली. प्राथमिक स्तरावर मूलभूत सुविधांवर काम त्या करतात. मानधन किती त्यापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

Ashish Shelar
Maharashtra politics : अशिष शेलारांनी घातलं गाऱ्हाणं, “त्यांचीच पनवती…”

बहिणीच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर स्टॅम्प ड्युटी नाही

आपण या विभागात खूप योजना आणल्या की, जवळपास साडे १२ हजार पात्र बहिणींना त्याचा लाभ मिळाला आहे. बहिणीच्या नावावर एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याला आता स्टॅम्प ड्युटी लागणार नाही याचा आम्ही विचार करतोय. एकीकडे जगभरात काही देश कर आकारणीमध्ये वाढ करत आहेत त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तू व सेवा कर (GST) शून्य आणि ५ टक्क्यांवर आणला आहे, असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.

Ashish Shelar
Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?

उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारणातील विशेषज्ञ

उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष संधी साधू आहे. उद्धव ठाकरेंनी आधी आमच्या मेहरबानीवर सत्ता मिळवली त्यानंतर काँग्रेसच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारणातील विशेषज्ञ आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. क्रिकेटपटू सरफराज खान यांच्याबाबत काँग्रेस प्रवक्त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाष्य करू शकत नाही. क्रिकेट बोर्डावरील खेळाडू आहेत तेच खेळाडूंची निवड करतात, असे शेलार यांनी सांगितले.

Ashish Shelar
Ramtek Film City | रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जागेचे १५ दिवसांत हस्तांतरण करणार : ॲड. आशिष शेलार यांची माहिती

संजय राऊत यांचे राजकीय ज्ञान किती उरलय?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे राजकीय ज्ञान किती उरलेय?, असा सवाल करत महायुती सरकारच्या विकास कामांमुळे संजय राऊत आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते ज्यांच्यासोबत बसलेत ते खंजीर खूपसत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Ashish Shelar
Ashish Shelar : ...तर ठाकरे बंधुंनी फडणवीसांचे अभिनंदन केले असते; विजयी मेळाव्यावर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

ठाकरे बंधूचे एकत्र येणे हा कौटुंबिक विषय

ठाकरे बंधूचे एकत्र येणे हा कौटुंबिक विषय आहे. दोन बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे, असे सांगत त्यांनी मनसे-शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर आपली भूमिका शेलार यांनी स्पष्ट केली. 'आगे आगे देखो होता है क्या'. त्यांना आधी भूमिका तर घेऊ द्या मग आम्ही बाण सोडू, असा इशाराही त्यांनी दिला.

Ashish Shelar
Ashish Shelar | बेईमान ऑफ द महाराष्ट्र पुरस्कार उद्धवजींना द्यावा : आशिष शेलार

जनतेने ज्यांना हाकललं त्या काँग्रेसला आम्ही काय उत्तर द्यायचे

देशासह राज्यातील जनतेने काँग्रेस पक्षाची हकालपट्टी केली आहे. अशा पक्षाच्या प्रश्नावर आम्ही काय उत्तर द्यायचे. भाई जगताप तुमच्याकडे आधी बळ आहे का, नंतर वेगळं लढायचं बोला. महापालिका निवडणुकीबाबत आमचे वरिष्ठ नेते बोलतील आणि निर्णय घेतील, असेही शेलार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news