Ramtek Film City | रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जागेचे १५ दिवसांत हस्तांतरण करणार : ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Ashish Shelar visit Nagpur | रामटेक परिसरातील संरक्षित स्मारकासंदर्भात महत्त्वाचे निर्णय
Ramtek Film City land transfer
रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी करताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार शेलार (Pudhari Photo)
Published on
Updated on

Ramtek Film City land transfer Ashish Shelar

नागपूर: चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या 15 दिवसात 60 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसेच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज (दि.१५) दिली. रामटेक परिसरातील संरक्षित स्मारकासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी आज केली व रामटेक येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते.

Ramtek Film City land transfer
Ratnagiri-Nagpur highway accident: रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

ॲड. शेलार म्हणाले, स्थानिक कलाकारांना योग्य मंच उपलब्ध करून देत विदर्भात चित्रपट निर्मिती आणि या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे. या कामाला गती देण्याच्या दिशेने आज महत्त्वाचे दोन निर्णय झाले असून याअंतर्गत महसूल विभागाच्या मालकीची 60 एकर जागा चित्रनगरीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

गड मंदिर परिसर सुविधा

रामटेक गड मंदिर परिसरात सोयी सुविधा संदर्भात येत्या 10 दिवसात पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र रामटेक येथील प्राचीन गड मंदिर परिसरात ऐतिहासिक मूल्य जपत येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह, दुकाने आदींचा समावेश असणाऱ्या अद्ययावत सोयी-सुविधा उभारण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्राप्त प्रस्तावास येत्या 10 दिवसात राज्य पुरातत्त्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा व त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Ramtek Film City land transfer
Nagpur Rain News | नागपूर विभागात गडचिरोलीत सर्वाधिक; गोंदियात सर्वात कमी पाऊस, सरासरी 789.5 मिमी पावसाची नोंद

जिल्हा वार्षिक नियोजन निधीतील 3 टक्के निधी ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या स्मारकांच्या संवर्धन व संरक्षणासाठी वापरण्याचे निर्देश आहेत. हा संपूर्ण निधी त्याच कारणासाठी वापरला जातो किंवा नाही याचा आढावा घेतला जाईल. अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद व त्यास मिळालेली मंजुरी व प्रत्यक्षातील कामे याचा नियमित आढावा घेऊन कामांना गती देण्याचा निर्णय झाल्याचेही मंत्री ॲड. शेलार म्हणाले.

मंत्रालयात हेरिटेज कॉरिडॉर डेस्क

दरम्यान,रामटेक गड मंदिरातील व्यापक विकास, सुशोभीकरण, ऐतिहासिक संवर्धन आणि जपणूक अशी विविध 23 विकास कामे 'रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर' नावाने करण्यात येणार असून ही कामे राज्य विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित व मंजूर करून घेण्यात येतील. यासंदर्भात वित्त विभागाकडून आवश्यक पाठपुरावा व सहकार्य मिळेल. अर्थसंकल्पातील मंजुरीनंतर ही कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी मंत्रालयात 'रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर' उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'प्राचीन वारसा स्थळे मनसर' या नावाने एकूण 156 एकरात प्राचीन मूल्य असणारी स्मारके अस्तित्वात असून स्मारक संवर्धनाच्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच एक सविस्तर प्रस्ताव तयार करून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांची स्वतः भेट घेणार असल्याचे ॲड शेलार यावेळी म्हणाले. याशिवाय रामटेक येथे दरवर्षी 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला येत्या पंधरा दिवसांत आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news