Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?

मित्र पक्ष काँग्रेसलाच फटकारले, लोकशाही वाचवण्यासाठी लढा समजून घेण्‍याचाही दिलाचाही सल्‍ला
Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?
Published on
Updated on
Summary
  • मविआमध्‍ये मनसे नको, असा सूर काँग्रेसच्‍या काही नेत्‍यांनी आळविण्‍यास सुरुवात केली आहे.

    • या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराज व्‍यक्‍त करत मित्र पक्ष काँग्रेसला फटकारले.

    • २०२९ मध्‍ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी राहणार का, असा सवालही त्‍यांनी केला.

Sanjay Raut criticizes Congress

मुंबई : एकीकडे मत चोरीचा आरोप करत महाविकास आघाडीतसह मनसेने १ नोव्‍हेंब रोजी रस्‍त्‍यावर उतरण्‍याची घोषणा केली आहे. अशाच मविआमध्‍ये मनसे नको, असा सूर काँग्रेसच्‍या काही नेत्‍यांनी आळविण्‍यास सुरुवात केली आहे. या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराज व्‍यक्‍त करत मित्र पक्ष काँग्रेसलाच फटकारले.

कोण काय बोलतय यावर मी आता मत व्यक्त करणार नाही

संजय राऊत आज (23 ऑक्‍टोबर) पत्रकार परिषदेत बोलताना म्‍हणाले की, काँग्रेस आमचा महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. आता काँग्रेसने तो निर्णय घेतला असेल तर त्यांचा प्रश्न आहे. संयुक्त लढ्यासारखा वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसने समजून घेतल पाहिजे.कोण काय बोलतात तेव्हा मी मत व्यक्त करणार नाही, असेही त्‍यांनी काँग्रेसला सुनावले.

Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?
Sanjay Raut On Election Commission : पदरचे पैसे घालणारे आम्ही कार्यकर्ते काय मूर्ख वाटलो का.... निवडणूक आयोगावर संजय राऊत जाम भडकले

आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं

महापौर पदाचा काय घेऊन बसला आहात. काँग्रेसची साथ सोडणार नाही असा प्रश्नच कुठे निर्माण झाला नाही. आम्‍हाला देशाचा पंतप्रधान काँग्रेस पक्षाच्‍या नेत्‍याला करायचे होते. आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं, असेस्‍पष्‍ट करत आम्हाला काही अडचण असेल तर आम्ही राहुल गांधींशी व्यतिरिक्त काही चार प्रमुख नेते त्यांच्याशी बोलू, असेही राऊत यांनी स्‍पष्‍ट केले.

Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?
Sanjay Raut On CJI Gavai : ही तर संविधानावर बुटफेक; सत्तेतील माणसंच जर.... संजय राऊत सर्वोच्च न्यायालयातील प्रकाराबाबत काय म्हणाले?

मुंबईतल्या प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत

मुंबईतल्या प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत आहेत, असा दावा करत हा शेवटी मुंबईचा प्रश्‍न आहे. आमच्‍या ज्या चौकशा करायचे त्या करा, तुम्ही मुख्यमंत्री आहात, असे आव्‍हान देत २०२९9 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदी राहतील का हा माझा प्रश्न आहे, असेही राऊत म्‍हणाले.

Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?
Sanjay Raut : केंद्र सरकार भयग्रस्त, गद्दारांना जबर किंमत मोजावी लागेल – संजय राऊत

फडणविसाना शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष फोडायचाय

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष फोडायचा आहे, या आरोपाचा पुन्‍नरुच्‍चार करत दोन दोन गुडघ्यावर बाशिंग बांधून देणाऱ्या शिंदे यांच्या स्वप्नावर पाणी फेरले, फडणवीसांना स्वयंभू राजकारण करायचा आहे. फडणवीसांना शिंदे यांचा बंदोबस्त करायला तयार आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

Sanjay Raut : "कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही" : संजय राऊत असे का म्‍हणाले?
Marathwada Rain : सरकार तुमचंय, आम्‍हाला कसले प्रश्‍न विचारताय ? : संजय राऊत

भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठीक ठिकाणी उफाळून आलाय

अलीकडच्या काळामध्ये भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठीकठिकाणी उफाळून आला आहे. भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट असा संघर्ष सूरु आहे. धनगेकरांना मालमसाला पुरवणारे हात वेगळे आहेत. धनगेकर एक मोहरा आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news