Pune Porsche Accident| हिट अँड रन प्रकरणात कोणालाही क्लीन चिट नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस

पोलिसांच्या कामगिरीचे केले कौतुक
Devendra Fadnavis
पेपरफुटीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाPudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : पुणे येथील हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी दाखवलेल्या हुशारीमुळेच सर्व पुरावे प्राप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुणे पोलिसांचे कौतुक केले.

Devendra Fadnavis
Worli hit and run case |वरळी हिट अँड रन प्रकरण: मिहिर शहाला ७ दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणात कोणालाही क्लीन चिट द्यायची नसून, पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी सक्रियतेने कारवाई केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे येथे पोर्शे आलिशान कारच्या धडकेत दोनजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार चालवणारा आरोपी हा अल्पवयीन असून, त्याने मद्य प्राशन केल्याचे समोर आले होते. या प्रकरणामुळे गृह विभाग, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील अनागोंदी समोर आल्याचे सांगत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे पोलिस आयुक्तांवर कारवाईची मागणी केली. चर्चेत विक्रम काळे, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, किरण सरनाईक आदींनी सहभाग घेतला.

Devendra Fadnavis
Bopodi Hit and Run Case| कोळी यांच्या घरच्यांना कसे सांगायचे? पोलिसच होते सुन्न

रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात डॉ. हल्लूर व डॉ. तावरे यांचे व्हॉटस्अ‍ॅप पोलिसांनी ट्रॅक केले. त्यामध्ये जे मध्यस्थ होते त्यांना अटक केल्यानंतर डॉक्टरांनी 3 लाख घेऊन रक्ताचे नमुने बदल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली.

Devendra Fadnavis
Hit and run case| पोलिसांना उडवून कारचालक घरी झोपला

पुण्यातील घटनेनंतर अनधिकृत पब आणि बारवर कारवाई करण्यात येत असून, इतर पब आणि बार वेळेवर बंद होतात किंवा नाही, यावर देखरेखीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही बसविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे बार आणि पब वेळेवर बंद झाले नाही तर कारवाई होणार, असा इशारा देत जवळपास 60 पब आणि बार बंद करण्यात आले असून, त्यांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news