पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात अटक केलेल्या मिहिर शहा याला आज (दि. १०) शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, मिहिरला अपघातानंतर किती लोकांनी मदत केली. त्याला लपण्यासाठी कोणी मदत केली, हे शोधायचे आहे. त्याच्याकडे कार चालवण्याचा परवाना आहे की नाही, हे शोधून काढावे लागेल. गाडीची नंबरप्लेट कुठे आहे, अपघातानंतर आरोपींनी ती टाकून दिली होती काय ? याचीही माहिती घ्यावी लागेल, त्यासाठी मिहिर याला पोलीस कोठडी मिळणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाहने कबुलीनामा दिला आहे. अपघाता दरम्यान मी गाडी चालवत असल्याचे त्याने मान्य केले आहे. कावेरी नाखवा (वय ४५) असे या अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात सोमवारी (दि.८) पहाटे घडला होता.
वरळी हिट अँड रन प्रकरणातील फरार आरोपी मिहिर शहाला ७२ तासांनंतर मंगळवारी अटक करण्यात आली. अपघातानंतर तो फरार झाला होता. मिहिर देश सोडून जाऊ नये, म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली होती. दरम्यान त्याने आज (दि.१०) पोलिसांना जबाब दिला आहे की, अपघाता दरम्यान मी गाडी चालवत होते. पुढील तपास करीत आहेत.