Bopodi Hit and Run Case| कोळी यांच्या घरच्यांना कसे सांगायचे? पोलिसच होते सुन्न

दहा दिवसांपूर्वीच त्यांची खडकी पोलिस ठाण्यात बदली झाली होती.
Pune hit and run case
Bopodi Hit and Run CasePudhari Photo
Published on
Updated on

पोलिस हवालदार समाधान कोळी मूळचे जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वडोदाचे नोकरीच्या निमित्ताने सांगवी परिसरात पत्नी, मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास होते. कोळी कामात चाणाक्ष होते.

Pune hit and run case
Nashik News | साडेतीन लाखांच्या अपहार प्रकरणी ग्रामविकास अधिकारी निलंबित

दहा दिवसांपूर्वीच त्यांची खडकी पोलिस ठाण्यात बदली झाली होती. यापूर्वी ते खडकी वाहतूक विभागात काम करत होते. चतुः शृंगी वाहतूक विभागातदेखील त्यांनी कर्तव्य बजावले आहे. पत्नी, मुलगा-मुलगी असा चौघांचा परिवार होता कोळी मनमिळावू स्वभावाचे होते.

त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समाधान कोळी यांचे चोपडा तालुक्यातील बडोदा हे मूळ गाव आहे. कोळी यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.

Pune hit and run case
Hit and run case| पोलिसांना उडवून कारचालक घरी झोपला

मुलगा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे, तर मुलगी आठवीच्या वर्गात आहे. हा प्रकार घडल्यानंतर काहीवेळ पोलिसच सुन होते. नेमके कोळी यांच्या घरच्यांना कसे सांगायचे, अस्त प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होता.

मात्र, पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांनी प्रसंगावधान राखत कोळी यांच्या चुलत भावशी संपर्क केला. त्यानंतर त्यांना या घटनेची माहिती दिली. कोळी यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता, कोळी यांची पुणे शहर पोलिस दलात सतरा हे अठरा वर्षे सेवा झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news