Nitin Chandrakant Desai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नितीन देसाई यांना श्रद्धांजली

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी ऑनलाईन डेस्क : "ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

'कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबींयावर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,' असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news