Anant Ashray Project: रिलायन्स फाऊंडेशनतर्फे 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय' प्रकल्पाची उभारणी

१०० एकरांवर साकार होणार ५,००० जणांसाठी कायमस्वरूपी निवासस्थान; अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मिळणार हक्काचे घर
Anant Ashray Project
Anant Ashray ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक, अध्यक्षा तीता अंबानी यांनी आज नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय या अनोख्या प्रकल्पाची घोषणा केली. अनाय मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना आयुष्यभरासाठी हक्काचे घर उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या माध्यमातून त्यांना सन्मानाने, सुरक्षित, प्रेमाने, आपुल्कवीच्या वातावरणात जगता यावे, यासाठी सर्वसमावेशक आरोग्यसेवा, आवश्यक देखभाल सुविधा तसेच वैयक्तिक विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

मुंबईजवळील कर्जत येथे या प्रकल्पाच्या जागी नीता अंबानी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पायाभरणी समारंम झाला, १०० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या प्रकल्पाची उभारणी टप्प्याटप्प्याने केली आणणार आहे. आवश्यक त्या मान्यता प्राप्त करून घेऊन, 'ना नफा तत्वावर बालणारी संस्था विकसित करण्यात येणार आहे.

प्रकल्पामागे नीता अंबानी यांची मूलभूत आणि दृढ भावना आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अगण्याचा अधिकार, प्रत्येकाला सहानुभूती, संवेदनशीलता, करुणा व प्रेम मिळाले पाहिजे, या विचारातून या प्रकल्पाची संकल्पना साकारली.

Anant Ashray Project
Mumbai water project: मनोरी गोडे पाणीनिर्मिती प्रकल्पाला महापालिकेचा हिरवा कंदील! २ हजार २४१ कोटींच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी

रिलायन्स फाऊंडेशनच्या 'दुई केअर' म्हणजे आम्ही काळजी घेतो या तत्चातून प्रेरुणा घेतलेला हा प्रकल्प असून 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रयः प्रत्येकासाठी एक घर' या संकल्पनेचे अर्थपूर्ण प्रतीक ठरेल. भूमिपूजन समारंभात बोलताना रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, माङयासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे.

दिव्यांग, निवाऱ्याची गरज असलेली मुझे आणि प्रेमळ सहवास व देखभालीची गरज असलेले ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी आपुलकीचे घर उमास्म्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. या ठिकाणी मनापासून घेतलेली काळजी आणि वैद्यकीय मदत यांचा सुरेख संगम कौटुंबिक जिव्हाळ्याच्या वातावरणाशी साधला जाईल.

निसर्गाच्या सान्निध्यात शिकण्याच्या, मैत्रीपूर्ण नाती जोडण्याच्या, सण-उत्सव आणि विविध सोहवयांचा आनंद घेण्याची संधी होशील प्रत्येकाला मिळेल. त्या म्हणाल्या, एक आई म्हणून माझी मनापासून इच्छा आहे की, आयुष्यभर मुलांच्या भविष्यावी आणि आपण नसताना त्यांची काळजी कोण घेणार, याची चिंता करणाऱ्या पालकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळेल.

आपल्यानंतरही आपल्या मुलाला हक्काचे घर आणि स्वतःचे कुटुंब लाभणार आहे, ही खाभी त्यांना मनःशांती देणारी ठरेल. महत्वाचे म्हणजे 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय'मुळे प्रत्येक वयोगटातील प्रत्येकाला सन्मानाने अगप्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे.

Anant Ashray Project
Juhi Mehta BMW Incident: ‘कितना पैसा चाहीए?’ म्हणत पोलिसाशी हुज्जत; जुही मेहताचा व्हिडीओ व्हायरल

घरापासून दूर असलेले जिव्हाळ्याचे घर 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय' या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती, अनाथ मुले आणि ज्येष्ठ नागरिक अशा ५०००हून अधिक रहिवाशांना आयुष्यभहसाठी हक्काचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

त्यांची काळजी घेण्णारे सेवक, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सहायक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यासहीत वसाहतीत १५,००० लोक राहतील अशी अपेक्षा आहे 'नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय' ही केवळ एक संस्था न राहता एक चैतन्यमय, प्रेमळ आणि काळजी करणारा समुदाय म्हणून विकनित होणार आहे.

येथील रहिवाशांना रुग्ण म्हणून नव्हे, तर शेजारी म्हणून एकत्रितपणे राहता येईल, कुटुंबातील सदस्यांना लाभणारी आपुलकी, सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना त्यांना येथे अनुभवता येईल, येथील घरे आणि रस्ते, मंदिर आणि रुग्णालय, मैदाने, उद्याने, शेती आणि कार्यशाळा अशा विविध सुविधा असतील, प्रत्येक रहिवाशाला लहान, कुटुंबाच्या धर्तीवर उभारलेल्या घरांमध्ये राहण्याची व्यवस्था असेल, प्रत्येक घराची रथचना आरामदायी, आपलेपणाची जाणीव करून देणारी असेल.

तेथे राहणाऱ्या लोकांना आपल्या खोल्या आवडत्या रंगाने रंगवायची, छायाचित्रे लावण्याची आणि आवडत्या वस्तू ठेवण्याची मुभा असेल. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमता यानुसार स्वतंत्र देखभाल आणि विकास आराखडा तयार केला आईल. हा आराखडा संबंधित व्यक्ती आणि तिच्या कुटुंबीयांशी चर्चा करून निश्चित केला आईल.

त्यात आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा सर्व बाबींचा समावेश असेल, प्रत्येक रहिवाशाच्या देखभालीचे समन्वयन साधण्यासाठी स्वतंत्र समन्वयक असेल, व्यक्तीच्या बदलत्या गरजांनुसार आवश्यक ते बदल करता यावेत, यासाठी या आराखडशाचा किमान दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जाईल.

बालपणापासून वृद्धापकाळापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेली मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. या प्रस्तावित यऊनशिपमध्ये आठ निवासी गावे असतील, भारतातील पवित्र नद्यांची नावे प्रत्येक गावाला देण्यात येणार आहेत. प्रत्येक गावाची स्वतंत्र रंगसंगती, विशिष्ट प्रतीकचिन्ह आणि उद्यान असेल.

त्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना सभोवतालचा परिसर सहज ओळखता येईल. नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय हा प्रकल्प आजूबाजूच्या परिसरातील सामूहिक जीवनाचा अविभाज्य भाग बनण्याचा प्रयत्न करेल, येथील मंदिर, क्रीडा सुविधा आणि उपाहारगृहे परिसरातील इतर गावांतील नागरिकांसाठीही खुली ठेवण्याची कल्पना आहे.

या परिसरातील सुमारे १,००० व्यक्तींना उपचारात्मक सेवा, शिक्षाण आणि रोजगारांच्या संधींचा लाम घेता येईल. याशिवाय समाजाभिमुख उपक्रम आणि आरोग्यसेवांच्या माध्यमातून हजारो अन्य नागरिकांनाही लाभ मिळेल.

सर्वांगीण देखभाल, आरोग्यसेवा, विकासाच्या संधी नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय प्रकल्पाच्या माध्यमातून विशेष आरोग्यसेवा, शिक्षण, पुनर्वसन, मनोरंजन आणि रोजगाराच्या संधी एकाच ठिकाणी उपलब्धमा करून दिल्या जाणार आहेत. प्रस्तावित सुविधा आणि सेवा कौटुंबिक निवासी घरे : कायारस्वरूपी वास्तव्यास असलेले गृहपालक आणि देखभाल करणारे यांच्या देखरेखीखाली रहिवाशांना स्थैर्य, आरामदायी वातावरण आणि त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणारी घरे.

विशेष रुग्णालय विकासात्मक औषधोपचार, अपस्मारावरील उपचार, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी दंतोपचार सर्वसमावेशक आरोग्या सेवा अत्याधुनिक पुनर्वसन सुविधा फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि अलोपचार सर्वसमावेशक क्रीडा आणि मनोरंजन सुविधा विविध खेळांबरोबरच संगीत, कला, सर्जनशील अभिव्यक्ती आणि विविध संवेदनानुभव घेता देतीन अशा सुविधा, सर्वसमावेशक शैक्षणिक व्यवस्था विशेष शिक्षणाच्या सुविधेबरोवरच कर्मचारी वर्गाच्या मुलांसाठी सर्वसामान्य शाळेची सुविधा उपलब्ध करून देणारी एकात्मिक शैक्षणिक व्यवस्था, प्राप्णी मैत्री आणि सहवासासाठी विशेष फार्म वनताराच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात येणारे विशेष क्षेत्र, जिथे रहिवासी आणि प्राप्णी यांच्यात प्रेमळ सहवास, मैत्रीपूर्ण नाते आणि अर्थपूर्ण संवाद निर्माण होण्यास प्रोत्साहन दिले जाईल, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी बेकरी, उपाहारगृहे आणि हस्तकला कार्यशाळा यासारख्या सुविधांच्या मध्यमातून रहिवाशांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

त्यामुळे त्यांना विविध कौशल्ये आत्मसात करता येतील. स्वतःच्या श्रमातून उत्पन्न मिळवता येईल आणि स्वावलंबनाचा अनुभव घेता येईल, कुटुंबासाठी तात्पुरत्या निवासाची सुविधा आणि फिरती वैद्यकीय पथके: कुटुंबाना काही काळासाठी विश्रांती आणि दिलासा मिळावा, तसेच जवळच्या चिल्ह्यांतील कुटुंबे आणि समुदायांना आवश्यक आरोग्यसेवा व मदत उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष निवासी सुविचा आणि फिरली वैहाकीय पथके कार्यरत असतील, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमी दिव्यांग व्यक्तींच्या देखभालीसाठी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची कौशल्ये आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण अकाद‌मी स्थापन केली जाईल.

विशेष उपशामक सेवा विभाग आणि स्मृतिवन : आयुष्याच्या अंतिम टप्प्यातील रुग्णांना शांततापूर्ण आणि सन्मानजनक वातावरणात सर्व सेवा देण्यासाठी नौता मुकेश अंबानी अनंत आश्रय प्रकल्प परित्यक्त, एकाकी आणि आयुष्यभर देखमालीची गरज असलेल्या व्यक्तींसाठी जाशेचा किरण आणि हक्काचे ठिकाण ठरणार आहे. आपल्या प्रियजनांची अनेक वर्षे निष्ठेने काळजी घेणाऱ्या, पण विशेष आरोग्यसेवा किंवा काही काळासाठी विश्रांती व पर्यायी देखभालीच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसलेल्या कुटुंबांनाही या उपक्रमातून मद‌तीचा हात दिला जाणार आहे.

दिव्यांगत्य, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, अपस्मार तसेच गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींना, ज्यांना सातत्याने तज्ज्ञ वैद्यकीय देखभालीची गरज असते, अशा व्यक्तींना मोठ्या शहराबाहेर अशा सुविधा मिळणे अनेकदा कठीण जाते. अशा व्यक्तीना आवश्यक ते सहाय्य, सुरक्षितता आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय या प्रकल्पाने ठेवले आहे.

सर्वांत महत्वाचे म्हणजे कोणालाही एकटे वाटू नये, प्राप्येकाच्या जीवनाला मोन आहे, याची जाणीव जपली जावी आणि प्रत्येक व्यक्तीला आपले म्हणता येईल असे हक्काचे घर मिळावे असे प्रेमळ आणि आश्वासक स्थान म्हणून नीता मुकेश अंबानी अनंत आश्रय विकसित व्हावे, ही या प्रकल्पामागील मुख्य संकल्पना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.