Sandeep Mistry Arrest: नीरव मोदीचा हस्तक मिस्त्रीचे प्रत्यार्पण; मुंबईत येताच सीबीआयकडून अटक

Nirav Modi PNB Scam: पीएनबी महाघोटाळ्यात ६,४९८.२० कोटींच्या फसवणुकीत सहभागाचा आरोप; ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
Sandeep Mistry Arrest
Sandeep Mistry ArrestPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कोट्यवधी रुपयांच्या महाघोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यावसायिक नीरव मोदीचा जवळचा साथीदार संदीप मिस्त्री याला संयुक्त अरब अमिरातीतून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने मंगळवारी मुंबईत अटक केली.

नोव्हेंबर २०२५ मध्ये विशेष न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने मिस्त्रीला विशेष न्यायालयात हजर केले; मात्र कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने त्याला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संदीप मिस्त्री हा नीरव मोदीच्या हाँगकाँगस्थित ‘फॅन्सी क्रिएशन्स लिमिटेड’ या बनावट कंपनीचा संचालक म्हणून कार्यरत होता. मिस्त्रीने नीरव मोदी आणि इतर सहआरोपींसोबत मिळून गुन्हेगारी कट रचला. या कटाच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेची तब्बल ६,४९८.२० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात मिस्त्रीचा थेट व सक्रिय सहभाग होता.

Sandeep Mistry Arrest
Maharashtra Drought Relief: निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही देणार मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

साक्षीदारांना धमकावणे आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप

भारतात गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप मिस्त्री, नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी आणि इतर वाँटेड आरोपींनी दुबईतील डमी संचालकांना अटक होण्याची भीती दाखवून धमकावले होते, असा दावा सीबीआयने केला आहे.

Sandeep Mistry Arrest
Ex Agniveer Jobs: माजी अग्निवीरांसाठी मोठी बातमी! सरकारी नोकऱ्यांत १० टक्के आरक्षण; लेखी परीक्षेतूनही सूट

कारवाई टाळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने कैरो (इजिप्त) येथे हलवण्यात आले. तपासात पुरावे मिळू नयेत म्हणून आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन नष्ट केल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news