Newborn Baby : मुंबईत 16 टक्के नवजात शिशुंमध्ये आढळतो श्रवणदोष

कामा रुग्णालयाच्या तपासणीत निष्कर्ष; वेळेत निदान होणे अत्यावश्यक
मुंबई
जन्मलेल्या 16 टक्के नवजात शिशुंमध्ये श्रवणदोष आढळला आहे.Pudhari News Network
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • नवजात शिशुंमध्ये प्रत्येक सहावे मूल ऐकण्यास असमर्थ

  • कामा रुग्णालयात झालेल्या तपासणीतील निष्कर्ष समोर

  • वेळेत निदान व उपचार न झाल्यास ही मुले आयुष्यभरासाठी बहिरी राहणार

मुंबई : जन्मलेल्या 16 टक्के नवजात शिशुंमध्ये श्रवणदोष आढळला आहे. म्हणजेच, प्रत्येक सहावे मूल ऐकण्यास असमर्थ आहे. कामा रुग्णालयात झालेल्या तपासणीत हे निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे वेळेत निदान व उपचार न झाल्यास ही मुले आयुष्यभरासाठी बहिरी राहू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

कामा रुग्णालयात नोव्हेंबर २०२४ पासून आजपर्यंत १५२ नवजात शिशुंची तपासणी झाली. त्यापैकी २५ शिशुंना वेगवेगळ्या पातळीवरील श्रवणदोष असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांच्या मते, वेळेवर निदान झाल्यामुळे या मुलांवर त्वरित उपचार सुरू झाले आहेत.

मुंबई
Newborn baby case : नवजात बाळाला कचर्‍यात फेकणार्‍या प्रियकराला अटक

या मुलांची ओटो-अकॅस्टिक एमिशन नावाची चाचणी पूर्णपणे वेदनारहित असून जन्मानंतर ४८ ते ७२ तासांत केली जाते. शिशूच्या कानात छोटा प्रोब ठेवून ध्वनी लहरी सोडल्या जातात आणि अंतर्गत प्रतिसाद मोजला जातो. दोष लवकर आढळल्यास वेळेत उपचार करता येतात. डॉक्टरांच्या मते, वेळेवर निदान व हस्तक्षेप झाल्यास कॉख्लिअर इम्प्लांट सारख्या तंत्रज्ञानाद्वारे ऐकण्याची क्षमता सुधारता येते. त्यामुळे मुलांच्या जीवनगुणवत्तेत मोठा बदल घडू शकतो.

Mumbai Latest News

मुंबई
Maharashtra Newborn Baby Stolen : राज्यात पाच वर्षांत पाच नवजात बाळांची चोरी

सर्व नवजात शिशुंसाठी

अनिवार्य OAE चाचणी लागू करावी, अशी मागणी रुग्णालय प्रशासनाने केली आहे. लवकर निदान केल्यास आयुष्यभराच्या कर्णदोषापासून बचाव शक्य असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news