Newborn baby case : नवजात बाळाला कचर्‍यात फेकणार्‍या प्रियकराला अटक

अनैतिक संबंधातून अल्पवयीन तरुणी राहिली गर्भवती
Newborn baby case
नवजात बाळाला कचर्‍यात फेकणार्‍या प्रियकराला अटकFile Photo
Published on
Updated on

डोंबिवली : एका 15 वर्षीय अल्पवयीन तरूणीचे 22 वर्षाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून तरूणी गर्भवती राहीली. त्यानंतर तिने मुलीला जन्म दिला. मात्र जन्मलेल्या मुलीला कल्याणच्या बारावे गावातील कचर्‍याच्या कुंडीत फेकून देण्यात आले. नवजात मुलीला बेवारस स्थितीत फेकणार्‍या आरोपीला शोधून काढण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले आहे. रोहीत प्रदीप पांडे (22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रविवारी 17 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बारावे गावातील शिवमंदिराजवळच्या कचरा कुंडीत बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. कचरा टाकण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेऊन या संदर्भात खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन बाळाला ताब्यात घेतले. नवजात बाळ मुलगी असल्याने प्रथम तिला उपचारासाठी रूग्णलायात दाखल केले.

एकीकडे एक दिवसापूर्वी जन्मलेल्या या बाळाची रवानगी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णलयात करण्यात आली. तर दुसरीकडे भारतीय न्याय संहिता कलम 64 (2), (एम), 93, 3 (5) सह बाल न्याय (लहान मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा 2015 चे कलम 75 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवून बाळाला बेवारस स्थितीत कचर्‍याच्या कुंडीत फेकून देणार्‍या तिच्या पालकांना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला.

बाळाचे पालकत्व लपविण्याच्या उद्देशातून हा प्रकार घडल्याने वरीष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय गायकवाड, सपोनि सतीश पाटील, पोलिस उपनिरीक्षक भूषण देवरे आणि त्यांच्या पथकाने त्या दिशेने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तरूणीला शोधून काढले. या तरूणीने बाळ आपलेच असल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी रोहित पांडे याला अटक केली. रोहितचे अल्पवयीन तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून या तरूणीने मुलीला जन्म दिला. पालकत्व लपविण्यासाठी नवजात एक दिवसाच्या मुलीला कचर्‍यात फेकून दिले.

संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याने रोहितच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. नवजात बाळाच्या अल्पवयीन आईला पोलिसांनी ठाण्याच्या सिव्हील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव होऊ लागल्याने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सद्या तिची प्रकृती स्थिर आहे. संबंधित आरोपी व अल्पवयीन तरूणाची डीएनए टेस्ट करणार येणार आहे. आरोपी तरूणाच्या माता-पित्यसाह तरूणीच्या आजीविरोधातही कारवाई केली जाणार आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक मारूती आंधळे आणि त्यांचे सहकारी या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news