NDA Studio Workers Issue: एनडीए स्टुडिओतील कामगारांवर उपासमारीची वेळ; वयाचे कारण देत अचानक कामावरून काढून टाकले

गेटच्या बाहेरच थांबविले
NDA Studio Workers Issue
NDA Studio Workers IssuePudhari
Published on
Updated on

खोपोली: एनडीए आर्ट वर्ल्ड स्टुडियो प्रा.लि कंपनीच्या प्रशासनाने ६० वयाचे कारण देत जवळपास १४ कामगारांना काढण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनी प्रशासनाने अधिक वय असल्याचे सांगत मुख्य गेटवरून प्रवेश देऊ नये. असा परिपत्रक काढले आहे.

कलादिग्दर्शक नितीन देसाईच्या निधनानंतर शासनाने दोन वर्षापुर्वी ताब्यात घेतल्यापासून कामगारांना पगार वाढ नाही, कोणतीही सुविधा नाही,कायस्वरूपी कामगारांना कोणतेही पूर्व कल्पना न देता काँट्रँक्टमध्ये वर्ग केले आहे.

NDA Studio Workers Issue
BEST Bus Strike Mumbai: बेस्‍टचा बेमुदत संप सुरू; बससेवा ठप्‍प! कामगारांचा कडकडीत बंद

बारकू तरे कामगार कामावर असताना ह्दयविकाराच्या झटका आला. रूग्णालयात घेवून जाण्यासाठी रूग्णवाहिका नसल्याने दुचाकीवरून घेवून जावे लागले. रूग्णालयातात वेळेवर पोहचले नसल्यामुळे तरे यांचा मृत्यु झाला.

बारकू तरेच्या कुटूंबाला आर्थिक मदत केली नसल्याने कामगारांनी आक्रमक पवित्रा घेवून प्रसारमाध्यमांकडे व्यथा मांडल्याने प्रशासनाने सर्व कामगारांना गेट बंद करुन टाकले. कर्जत- चौक रस्त्यावरील एनडीए स्टुडिओ स्थानिक कामगार अनेक वर्षापासून काम करीत आहेत.

कलादिग्दर्शक नितीन देसाई असताना कामगारांना वेळेवर पगार आणि सर्व सुविधा मिळत होत्या तसेच कामागारांचा मानसन्मान राखला जात होता. मात्र राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी एनडीए स्टूडियो ताब्यात घेतला आहे.

तेव्हापासून याठिकाणी एकही शुटींग सुरू नाही तसेच दादांबरोबर अनेक वर्ष कामगारांना ३०० रूपयात राबवितात मात्र नवीन कामगारांना ३० हजाराच्या पुढे पगार देताना टेंडर प्रोसेस लागू नाही का ? अशी प्रचंड नाराजी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केल्याने काही कामागारांनी नोटीस बजावली आहे.

NDA Studio Workers Issue
School Uniform Delay: नवी मुंबई पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत गणवेश

सरकारने हिशोब द्यावा

कामगारांनी एनडीए स्टुडियोच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जमून या घटने बाबत नाराजी व्यक्त केली. एनडीए स्टुडिओ सुरू झाल्यापासून नितीन देसाई यांच्या समवेत काम केले आहे. संपूर्ण आयुष्यभर श्रम केले आहे. तडकाफडकी कामावरुन काढून टाकणे निंदनीय आहे.शासनाने आम्हाला सेवानिवृत्ती निमित्ताने हिशोब द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news