राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्ह प्रकरणावरील सुनावणी १६ जुलैला?

Split in the Nationalist Congress Party
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. Pudhari News Network

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आले. या निर्णयाला शरद पवार गटाकडून आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर आता १६ जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाचे नियमित कामकाज ८ जुलैपासून होणार आहे.

Split in the Nationalist Congress Party
शरद पवार यांच्याहस्ते सोमवारी द्राक्ष संघ इमारतीचे उद्घाटन

Summary

  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, शरद पवार गट आणि अजित पवार गट

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे

  • शरद पवार गटाकडून आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका

Split in the Nationalist Congress Party
नार्वेकर कुणाची विकेट काढणार? शिंदे, अजित पवार गटांत धाकधूक वाढली

पुढील सुनावणीसाठी १६ जुलै संभाव्य तारीख

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला. हा वाद पुढे निवडणूक आयोगात गेला. आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर पुढील सुनावणीसाठी १६ जुलै ही संभाव्य तारीख दिली आहे.

Split in the Nationalist Congress Party
महायुती जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? नऊ जागांवर अजित पवार गटाचा दावा

अजित पवार गटाला नोटीस

या प्रकरणात १९ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नोटीस जारी केली होती आणि चार आठवड्यात त्यांचे उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. ते अद्याप अजित पवार गटाने दाखल केलेले नाही. अजित पवार गटाच्या उत्तरानंतरच शरद पवार गटाला दोन आठवड्यात रिजॉईंडर दाखल करायचे आहे. कारण त्यांचे रिजॉईंडर हे अजित पवार गटाच्या उत्तरावरील प्रतिसाद असेल.

दोन्ही गटांत सुनावणीदरम्यान खडाजंगी होण्याची शक्यता

त्यामुळे अजित पवार गटाचे उत्तर जेवढे लांबेल, तेवढेच शरद पवार गटाचे रिजॉईंडर लांबेल, या पार्श्वभूमीवर १६ जुलैला होणाऱ्या सुनावणीपूर्वी अजित पवार गटाच्या वतीने उत्तर दाखल केले जाऊ शकते. मात्र, अजित पवार गटाने आगामी सुनावणीपूर्वी उत्तर दाखल केले नाही. तर यावरून दोन्ही गटात सुनावणीदरम्यान खडाजंगी होऊ शकते, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news