महायुती जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? नऊ जागांवर अजित पवार गटाचा दावा

महायुती जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? नऊ जागांवर अजित पवार गटाचा दावा

[author title="सुहास जगताप" image="http://"][/author]

पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागांच्या वाटपाचा तिढा कसा सोडवायचा, हे निवडणुकीपूर्वीचे सर्वांत मोठे आव्हान महायुतीसमोर आहे. या दहापैकी नऊ जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकल्याने हे गणित फारच अवघड झाले आहे.

भाजपकडे केवळ एक आमदार आहे, तर शिंदे गटाकडे एकही आमदार नाही

या दहा जागांपैकी बारामती, इंदापूर, शिरूर-हवेली, आंबेगाव-शिरूर, खेड-आळंदी, जुन्नर, मावळ या सात विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, त्यातील शिरूरचे आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असले, तरी अजित पवार यांच्या पक्षाचा त्यावर दावा असणार आहे. महायुतीत भाजपकडे केवळ एक दौंडचे आमदार आहेत. शिंदे गटाकडे एकही विद्यमान आमदार नाही. भोर आणि पुरंदर येथे काँग्रेसचे आमदार असल्याने तेथेही अजित पवार गटाने दावा ठोकला आहे, ते बाजूला ठेवले तरी महायुतीत जागा वाटताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या जागा घटक पक्षातील इतर पक्षांना कशा देणार, हा मोठा वादाचा विषय होणार आहे. या सात जागांपैकी शिरूरचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदारांचा मतदारसंघ वगळला, तर अजित पवार यांच्याकडे असलेल्या सहा आमदारांच्या मतदासंघात मावळमधील अल्प आघाडी वगळता कोठेच लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळालेली नाही, हा मुद्दाही युतीच्या जागावाटपात पुढे येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या जागा त्यांना दिल्यास घटक पक्षांच्या वाट्याला फक्त तीन जागा येणार आहेत, त्यातही दौंडची एक जागा भाजपकडे असल्याने फक्त पुरंदर आणि भोरच्या जागेवरच महायुतीत चर्चा होऊ शकेल, अशी स्थिती सध्या तरी आहे. पुरंदरलाही शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे असल्याने ती जागा शिंदे गटाकडे जाईल. मग फक्त भोरची जागा कोणाला द्यायची, हाच प्रश्न उरेल,परंतु हे गणित एवढे सोपे राहिलेले नाही. जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजप आणि शिंदे शिवसेना पक्षांमध्ये विधानसभेला इच्छुकांची प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या आहे, त्यामुळे जागावाटपाचे गणित कसे सोडवायचे, ही मोठी डोकेदुखी महायुतीत आहे.

अजित पवार यांनाही त्यांच्या सर्व जागा मिळाल्या, तरी उमेदवारी वाटप फार अवघड ठरणार आहे. त्यांच्या पक्षातही मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या आहे. बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

'महायुती'समोरील प्रश्न

इंदापूमोठा प्रश्न महायुती समोर आहेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि शिंदे शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांचे प्रश्न कसे सोडवायचे, हा मोठा प्रश्न महायुती समोर आहे. या तीन मतदारसंघांत जागावाटपावरून घनघोर लढाई होणार हे निश्चित आहे. कारण या प्रत्येक नेत्याने विधानसभेची जोरदार तयारी केलेली आहे. या वेळी विधानसभा लढवायचीच आणि जिंकायचीच याची तयारी हे नेते गेल्या विधानसभेच्या निकालापासून करत आहेत.

या शिवाय खेडमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप मोहीते आणि शिंदे शिवसेनेचे भगवान पोखरकर, नितीन गोरे, भोरमध्ये भाजपचे किरण दगडे आणि माजी आमदार शरद ढमाले, शिंदे गटाचे बाळासाहेब चांदेरे आणि कुलदीप कोंडे, राष्ट्रवादीचे रणजित शिवतारे आणि विक्रम खुटवड, पुरंदर-हवेलीत शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे,राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर दुर्गाडे, तर भाजपचे माजी आमदार अशोक टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, माजी जिल्हा परिषद सभापती बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे, राहुल शेवाळे, मावळमध्ये भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे, मावळ विधानसभा भाजप प्रमुख रवींद्र भेगडे अशी महायुतीकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी असल्याने जागावाटप, नंतर उमेदवारीवाटप आणि बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर असेल, हे मात्र निश्चित चित्र दिसत आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news