शरद पवार यांच्याहस्ते सोमवारी द्राक्ष संघ इमारतीचे उद्घाटन

तासगावात कार्यक्रम : ‘बेदाणा उत्पादन आणि विपणन’ विषयावर होणार चर्चासत्र
Sharad Pawar
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते द्राक्ष संघ इमारतीचे उद्घाटनFile Photo
Published on
Updated on

सांगली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ तासगाव शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याहस्ते सोमवारी सकाळी दहा वाजता तासगाव-चिंचणी रोडवर होणार आहे. यानिमित्ताने ‘बेदाणा उत्पादन आणि विपणन’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे, अशी माहिती संघाचे सांगली विभागाचे अध्यक्ष संजय बरगाले यांनी दिली. यावेळी मानद सचिव प्रफुल्ल पाटील, चेअरमन चंद्रकांत लांडगे उपस्थित होते.

बरगाले म्हणाले, संघाचे 32 हजार 600 सदस्य असून 3 लाख 75 हजार एकरावर द्राक्ष लागवड आहे. सुमारे 35 लाख मे. टन द्राक्ष उत्पादन होते. द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. उत्तम प्रतीचा बेदाणा उत्पादित होतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून द्राक्ष उत्पादन व द्राक्ष गुणवत्ता वाढविण्याचे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे काम संघ 63 वर्षे करीत आहे. संघाच्या तासगाव शाखेकरिता नवीन अद्ययावत इमारत उभी करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते होणार आहे, तर अध्यक्षस्थानी संघाचे राज्य अध्यक्ष शिवाजीराव पवार आहेत.

Sharad Pawar
सरकार कसे हातात येत नाही ते पाहतोच : शरद पवार

माजी खासदार संजय पाटील, आ. सुमन पाटील प्रमुख पाहुणे आहेत. चर्चासत्रात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणेचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, शास्त्रज्ञ डॉ. अजय शर्मा, डॉ. अभय शेंडे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेमध्ये बेदाणा उत्पादन व मार्केटिंग या विषयावर गटचर्चा होणार असून त्यामध्ये शास्त्रज्ञ, बेदाणा व्यापारी, बेदाणा उत्पादक, निर्यातदार व बेदाणा मशिनरी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहे. तासगाव-चिंचणी रोडवर हा कार्यक्रम होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news